मुंबई,

 2018 मध्ये सुरू झालेल्या मीटू चळवळीदरम्यान बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सवर लैंगिक शोषणाचा आरोप होता. ज्यात संगीतकार अनू मलिक यांचेही नाव होते. अनूवर सोना महापात्रा, श्‍वेता पंडित, नेहा भसीन, केरालिसा मॉन्टेरिओ आणि डॅनिका डिसूझा यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या आरोपाची चौकशी करीत असताना राष्ट्रीय महिला आयोगाने अनू विरूद्ध पुरेसे पुरावे न मिळाल्यामुळे आणि तक्रारदार समोर हजर न राहिल्याने खटला बंद केला आहे.

कमिशनच्या बरनाली शॉम यांनी सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माधुरी मल्होत्रा यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एनसीडब्ल्यूने अनू मलिकवरील खटला बंद केला आहे. आयोगाने सोना मोहापात्राकडे आरोपांसंबंधीची कागदपत्रे मागविली होती, ती सोनाने उपलब्ध करुन दिली नाहीत. या पत्रामध्ये सोनासाठी असे लिहिले आहे की - यासंदर्भात 6 डिसेंबर 2019 रोजी आयोगाला तुमची प्रतिक्रिया मिळाली आहे. वरील बाबी लक्षात घेता मला हे कळवण्यास सांगण्यात आले आहे की, फिर्यादींकडून मागविण्यात आलेले पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्यामुळे खटला बंद करण्यात आला आहे.

अवश्य वाचा

सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे.