बेळगाव

 महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यातीस हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कर्नाटकातील बेळगावात गेलेल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना दरवर्षी 17 जानेवारी रोजी बेळगावच्या हुतात्मा चौकात अभिवादन केले जाते. महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तींनी बेळगावात येऊ नये यासाठी कर्नाटक पोलिस राष्ट्रीय महामार्गावर पहाटेपासूनच वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी कोणताही सरकारी फौजफाटा न घेता राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर कर्नाटकमधील बेळगावातील हौतात्मा चौकात सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. यादरम्यान कर्नाटक पोलिसांना त्यांना जाण्यास रोखले त्यामुळे पोलिसांसोबत यड्रावकरचांचा वाद झाला. तसेच, यावेळी यड्रावकर यांना धक्काबुक्कीदेखील करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी राजेंद्र यड्रावकर यांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर पोलिसांनी यड्रावकर यांना सीमेबाहेर सोडल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेनंतर गावात तनावाची वातावरण निर्माण झाले आहे.

 

अवश्य वाचा

सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे.