जेएनपीटी,

विजेच्या तारांना स्पर्श होवून लागलेल्या आगीमध्ये एक ट्रक भस्मसात झाल्याची घटना जसखार गावाजवळ घडली.या आगीत ट्रकचा चालक बचावला असून जसखार गावातील रहिवाशांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.  एक ट्रक लोखंडी माडण्या घेवून निघाला होता. मात्र रस्ता चूकून हा ट्रक न्हावाशेवा पोलिस ठाण्याजवळच्या रस्त्यावर आला. रस्त्याच्या वरून गेलेल्या वीजेच्या तारांचा चालकाला अंदाज न आल्याने ट्रक मधिल लोखंडी मांडण्याना या वीज तारांचा स्पर्श झाला आणि त्यातून पडलेल्या ठिणग्यांमुळे या ट्रकने पेट घेतला. सुदैवाने ट्रक चालकाने गाडीतून उडी टाकल्याने तो वाचला. या आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. या बाबत न्हावा शेवा पोलिस ठाण्यात आकस्मिक आग म्हणून नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

अवश्य वाचा

सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे.