कर्जत-

 आकडे टाकणे, चोरून वीज वापरणे याचे प्रमाण जास्त असल्याने महावितरण कंपनी नेहमीच तोट्यात असते, महावितरण कंपनीने वीज चोरी प्रकरणी कर्जत मध्ये धडक मोहीम राबविली असून तालुक्यातील पाच जणांवर कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

  महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आनंद घुले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी यांनी वीज चोरी प्रकरणी धडक कारवाई केली, महावितरण कंपनीचे विद्युत मीटर नसताना कंपनीच्या एल. टी. लाईनवर आकडा टाकून  घरातील बोर्डात डायरेक्ट कनेक्शन घेतली असल्याचे आढळून आली, यावेळी तालुक्यातील  तिवरे, तांबस, उमरोली मधील प्रत्येकी एक आणि सापेले मधील दोन अश्या पाच जणांनी 6 हजार 293 युनिटची,  74 हजार 770 रुपयांची चोरी केली आहे या पाच जणांवर कर्जत पोलीस ठाण्यात कनिष्ठ अभियंता वैभव डफळ यांनी फिर्याद दाखल केली आहे, या पाच जणां विरुद्ध तक्रार दाखल झाली असून पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वेगवेगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तपास करीत आहेत.

 तिवरे येथे राहणारे चंद्रकांत खंडू ठाकरे यांच्या निवासस्थानी महावितरण कंपनीचा विदयुत मिटर नसताना महावितरण कंपनीच्या एल.टी लाईनवर आकडा टाकुन काळया वायरचे दुसरे टोक घरातील लाईटच्या बोर्डला डायरेक्ट कनेक्शन जोडुन एकूण 15हजार 140 रुपये किमतीची 1404 युनिटची विज चोरी केली.   सापले येथील जगदीश अण्णा पवार यांच्या घरी महावितरण कंपनीचा विदयुत मिटर नसताना महावितरण कंपनीच्या एल.टी लाईनवर आकडा टाकुन काळया वायरचे दुसरे टोक घरातील लाईटच्या बोर्डला डायरेक्ट कनेक्शन जोडुन एकूण 15,140/-रुपये किमतीची 1404 युनिटची  विज चोरी केली.

     तांबस येथे राहणारे राजेंद्र रघुनाथ शेळके यांच्या घरी  महावितरण कंपनीचा विदयुत मिटर नसताना महावितरण कंपनीच्या एल.टी लाईनवर आकडा टाकुन काळया वायरचे दुसरे टोक घरातील लाईटच्या बोर्डला डायरेक्ट कनेक्शन जोडुन एकूण 15हजार 140 रुपये किमतीची 1404 युनिटची विज चोरी केली.  सापेले येथे राहणारे दिपक बाळाराम पवार यांच्या निवासस्थानी कंपनीचा विदयुत मिटर नसताना महावितरण कंपनीच्या एल.टी लाईनवर आकडा टाकुन काळया वायरचे दुसरे टोक घरातील लाईटच्या बोर्डला डायरेक्ट कनेक्शन जोडुन एकूण 13 हजार 330 रुपये किमतीची 1284 युनिटची  विज  चोरी करून  कायम स्वरूपी थकबाकी एकूण 18 हजार 100 रुपये किमतीची असे एकूण वीज बिल 31हजार 430रुपये किमतीची महावितरण कंपनीस भरले नाही .मरोली येथे राहणारे किशोर भानुदास लोंगले यांच्या निवासस्थानी महावितरण कंपनीचा विदयुत मिटर नसताना महावितरण कंपनीच्या एल.टी लाईनवर आकडा टाकुन काळया वायरचे दुसरे टोक घरातील लाईटच्या बोर्डला डायरेक्ट कनेक्शन जोडुन  एकूण 16 हजार 20 रुपये किमतीची 877 युनिटची  वीज चोरी केल्याचे तपासात उघड झालेले आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली