मुंबई.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतरही सरकारी बंगले न सोडणार्‍या माजी मंत्र्यांना राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीसा पाठवल्या आहेत. मागील आठवड्यामध्ये फडणवीस सरकारमध्ये मंत्री असणार्‍या नऊ नेत्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीसा पाठवण्यात आलेल्या मंत्र्यांपैकी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी अद्यापही बंगले सोडलेले नाहीत.

सार्वजनिक बांधकाम खात्याने नोटीसा पाठवलेल्या मंत्र्यांमध्ये भाजपाबरोबरच शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेस आहे. यामध्ये रामदास कदम, सुभाष देशमुख, दीपक केसरकर, अर्जुन खोतकर आणि नुकतेच पक्षात दाखल झालेले क्षीरसागर अशा या शिवसेनेच्या पाच माजी मंत्र्यांचा समावेश आहे. याचबरोबर मदन येरावर, अविनाश महातेकर, सुरेश खाडे यांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगले खाली करण्याची नोटीस पाठवली आहे. नोटीस पाठवण्यात आलेल्या नऊ पैकी सात मंत्र्यांनी बंगले सोडले आहेत. केवळ मुनगंटीवार आणि क्षीरसागर यांनी अद्याप बंगले सोडलेले नाहीत. आता हे दोन्ही माजी मंत्री सरकारी बंगले कधी सोडणार हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.

अवश्य वाचा

सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे.