मुंबई

महाराष्ट्र विकास आघाडीची विजयी घोडदौड कायम आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतल्याने दौंड यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले.   विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या एका जागेसाठी 24 जानेवारी रोजी पोटनिवडणूक होणार होती. या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे संजय दौंड तर भाजपकडून राजन तेली निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. मात्र, विधान परिषदेत महाविकास आघाडीकडे 170 सदस्यांचं बळ असल्याने दौंड यांचा विजय निश्‍चित होता. हीच बाब लक्षात घेऊन भाजपचे उमेदवार राजन तेली यांनी  आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

 

अवश्य वाचा

सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे.