वाकण 

लायन्स क्लब नागोठणे कडून बुधवार दि. 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधून नागोठण्यातील स्वच्छता मोहिमेत महत्वाची भूमिका बजावणार्‍या नागोठणे ग्रामपंचायतीच्या सर्व सफाई कामगारांना व त्याचे सुपरवायझर यांना तीळगुळ व भेटवस्तू देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

नागोठण्याचे सरपंच डॉ. मिलींद धात्रक , ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र देशपांडे यांच्या प्रमुख  उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात  सरपंच डॉ. मिलींद धात्रक यांचा शाल व सन्मानचिन्ह देवून नागोठणे लायन्स क्लब तर्फे सत्कार करण्यात आला.  प्रास्ताविक करताना लायन विवेक सुभेकर यांनी सफाई कामगार व गाव यांचा संबंध व त्यांचे गावासाठी असलेले महत्वपुर्ण योगदान यावर आपले मनोगत व्यक्त केले. लायन यशवंत चित्रे यांनी लायन्स क्लबच्या सेवेबद्दल माहीती देवून प्रत्येक कामागाराची कौंटूंबीक माहीती व त्यांचे प्रती आपली भावना व्यक्त केली. यावेळी सर्व सफाई कामगारांना ब्लँकेट, चटई व कापडी पिशवी तसेच तीळगुळ देवून सन्मानीत करण्यात आले.

या कार्यक्रमाबद्दल मत व्यक्त करताना सरपंच डॉ. मिलींद धात्रक यांनी लायन्स क्लबचे आभार मानले व  लायन्स क्लबच्या नागोठण्यातील सर्व उपक्रमांस ग्रामपंचायतीचे कायम सहकार्य मिळत राहील हे आवर्जुन सांगीतले.

या कार्यक्रमाला नागोठणे लायन्स क्लबच्या अध्यक्षा लायन सुजाता जवके, उपाध्यक्ष लायन संदिप नायर, सचिव एमजेएफ लायन विवेक सुभेकर, खजिनदार  लायन यशवंत चित्रे, संचालक लायन संतोष झालगे, लायन दौलत मोदी, लायन विवेक करडे, लायन रमाकांत काळे तसेच सर्व सफाई कामगार उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे.