रेवदंडा

चौल रायगड जिल्हांतील अलिबाग तालुक्यातील नारळ पोफळीच्या बागेत विसावलेले गाव, निसर्गाने हिरवा शेला पांघरलेला एका बाजूला समुद्र किनारा, पुर्वेकडे डोंगराची रांग असे हे नारळ-पोफळीच्या झाडांनी वेढलेले पुरातन श्रीमंत नगर, या नगराला पौराणिक, ऐतिहासीक असा वैभवशाली इतिहास आहे. चौलमध्ये 360 मंदिरे 360 तलाव असल्याची इतिहासात नोंद आढळते. अनेक देवदेवतांची प्राचीन मंदिरे अदयापी पहावयास मिळतात. त्यापैकी चौलचे श्रध्दा व भक्तीचे स्थान असलेले श्री मुखरी गणपती हे होय.

चौल मधील श्री मुखरी गणपतीस अन्ययसाधरण महत्व आहे. हे मंदिर अलिबाग पासून 14 कि.मी.अंतरावर रेवदंडा हमरस्तावर आहे. श्री मुखरी (मुख्य ) स्वयंभू गणपतीचे मंदिर हे तिनशे वर्षापुर्वीचे असावे असे सांगितले जाते. या मंदिरातील श्री गणेशाची मुर्ती श्री राऊत घराण्याच्या जागेत सापडली व मग तेथेच तिची स्थापना केली. तेव्हापासून तिचे पुजारीपण आजतागायत त्याच्याकडे आहे. इतिहासकालीन अपर चौल हे मुसलमानी अमलाखाली असताना या शब्दाचे मुखरी असे अपभ्रशात्मक रूप होऊन ते रूढ झाले.मुखरी नावाचा कोळयाचा मुलगा मासेमारीसाठी गेला असता दोन दिवस परतला नाही तेव्हा त्यांन त्यावेळी उघडयावरच असलेल्या या गणपतीला मुलगा परतल्यास येथे मंदिर बांधीन असा नवस केला. त्यानंतर त्याचा मुलगा घरी सुखरूप परतल्यावर त्याने छोटेश देऊळ बांधले तेव्हापासून या गणपतीला मुखरीच्या गणपती असे नाव पडले. आणखीन एक कथा या मंदिराबाबत सांगितली जाते. ती अशी की या गणपतीला एक हस्तीदंती दात आला, तो काही समाजकंटकानी तोडून टाकला. त्यावेळी गणपतीच्या डोळयांतून अश्रूधारा वाहिल्या.

श्री मुख्य (मुखरी ) या स्वयंभू गणेशाच्या जुन्या मंदिराची रचना देखील मोठी सुंदर आकर्षक होती. स्वयंभू श्री गणेशाची अडीचफुट उंचीची देखणी मुर्ती छोटासाच गाभारा, समोर प्रशस्त दालन, नारळ सुपारीच्या झाडांनी वेढलेल्या सुंदर रमणीय परिसर मंदिरासमोरील तुळशी वृंदावन, दिपमाळा, विस्तीर्ण पोखरण या सर्वामुळे मंदिराची शोभा अतिशय विलोभनीय झाली. आहे. हे देऊळ चौलच्या उत्तरेकडील पाच पाखाडयातील ग्रामस्थांच्या ताब्यात आहे.

माघ शुध्द चतुर्थीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. जुन्या मंदिरात या उत्सवाची सुरूवात 1967 साली श्रीमती गंगाबाई चितामंण पाटील यांनी केली. त्याना सर्व लहानथोर दादी नावाने हाक मारत असत. दादीचा जन्म मुरूड तालुक्यातील नांदगाव गावी झाला. फार पुर्वीपासून नांदगाव येथे श्री गणेश मंदिरात माघी उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. लहानपणापासून हा उत्सव पाहिल्यामुळे श्री गणेशावर असीम भक्ती असणार्‍या दादीच्या मनात घरासमोरील श्री गणेश मंदिरातही असाच माघी गणेश जन्माचा उत्सव साजरा करावा अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. ती गणेश जन्माकरीता लागणारी मुर्ती सहस्त्र दुर्वासह पुजा, गणेश जन्माची आख्यायिका सांगण्याकरीता किर्तनाची व्यवस्था, जमणार्‍या भाविकांना जन्मोत्सवानंतर प्रसाद,किर्तन, ऐकू जाण्याकरता लाऊउस्पिकरची व्यवस्था व श्री गणेशाची मुर्ती त्यांच्या घरातून देवळात आणण्याच्या वेळी ताशे वाजंत्री वरील सर्व कार्यक्रमांचा खर्च दादीने स्वतःचे शिरावर घेऊन ही कल्पना पाच पाडयांतील ग्रामस्थांच्या कानावर घातली. ग्रामस्थांनी या श्री मुखरी गणेशाच्या जन्मोत्सवाची परवानगी दिली. तेव्हापासून श्री मुखरी गणपती चौल मंदिरात माघी उत्सव मोठया आनंदाने साजरा करण्यात येतो. श्री मुखरी गणपती विषयी दादीच्या मनात जी अनन्य असीम भक्ती होती. आपला ऐकमेव रक्षणकर्ता आहे अशी भावना त्यांच्या मनात होती. दादीना वयाच्या तिसाव्या वर्षी वैधव्य आले. तेव्हा  त्यांच्या पदरात सहा मुले होती.मोठा मुलगा आठ वर्षाचा तर सर्वात लहान मुलगी अवघी सहा महिन्याची, त्या दररोज उठल्यावर,ओटीवर येऊन गणपतीला नमस्कार करून दीनचर्येला सुरूवात करीत असत. सकाळच्या जेवणाच्या अगोदर गणपतीला पाच दुर्वा वाहिल्या शिवाय त्यांनी कधी जेवण केले नाही. रात्री झोपताना श्री गणरायाचे नामस्मरण करूनच झोपी जात असत. श्री मुखरी गणपती माघी उत्सवाची कल्पना आजूबाजूच्या तरूण मंडळीनी सुध्दा उचलून धरून दादीना साथ दिली. यामध्ये  मधुकर नाईक, संभाजी शेडगे, मदन कंटक, श्रीमती पाटील शिक्षीका लिला होळकर यांच्या समावेश होता. दुसर्‍या वर्षी वरील तरूण मंडळीनी चार आणे देणगीची पावती फाडून उत्सवाच्या रात्री करमणुक म्हणून रात्री सिनेमा दाखविला तेव्हापासून या माघी उत्सवाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागून गावागावामध्ये उत्सवाचा ठसा ठळकपणे जाणवू लागला. त्यानंतर दादीच्या मनात जुन्या मंदिराचा जिर्णोध्दार करावा अशी मनोमन विचार आले. याबद्दल पाच पाखाडी सरपंच कै. काकाजी भगत यांचे जवळ मंदिराच्या जिर्णोध्दाराचा विचार प्रकट केला. कै. काकाजी भगत यांनी गावकर्‍यांच्या संमतीने हे पवित्र कार्य करण्याचा संकल्प केला. दादीच्या  सन 1971 सालात निधनानंतर  श्री मुख्य गणपती मंदिराचा जिर्णोध्दाराचा कामाचा शुभारंभ झाला. पुरेसा निधी जमा होण्याअगोदर काकाजी भगत यांचे निधन झाले. चौल मधील श्री विनोद करंगुटकर, तुरे मास्तर, कृष्णाजी पराड, या मंडळीनी अतिशय परिश्रम घेतल्याने आजची श्री मुखरी गणपतीच्य मंदिराची सुंदर वास्तू उभी राहीली आहे. या मंदिराचे विश्‍वस्त मंडळ असून दादीचे पुत्र मनोहर, भास्कर व शंकर यांचे मोलाचे सहकार्य या मंदिरासाठी मिळते. आजच्या उत्सवाचे स्वरूप पुर्वीपेक्षा फारच विलोभनिय आहे. सकाळपासून पुजेचा सोहळा किर्तन, प्रसाद आजी दादीच्या मुलांकडून सुनांकडून व नांतवडाकडून केला जातो. माघी उत्सवाचे दिवशी श्री मुखरी गणेशाच्या दर्शनासाठी आजही रांग लागलेली दिसून येते. रात्री लोकांना आवडणारा करमणुकीचा कार्यक्रम दुसरा दिवशी महाप्रसादाचा लाभ भाविकाना दिला जातो. दर संकष्टीला येथे दर्शनासाठी भक्तमंडळीचे मोठी रांग लागलेली दिसून येते. सध्या हे मंदिर चौलवासिंयासह परिसरातील श्री गणेश भक्ताचे श्रध्दा व भक्तीचे स्थान बनले आहे.

 

अवश्य वाचा