कर्जत 

               कर्जत नगरपरिषद कार्यालयासमोर काही वषार्ंपूर्वी अनधिकृत बांधकाम करून दोन टपर्‍या उभ्या करण्यात आल्या होत्या, अखेर दोन्ही टपर्‍यावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी धडक कारवाई करून दोन्ही अनधिकृत टपर्‍या जमीनदोस्त केल्या आहेत.

               ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद अश्या दोन्हीच्या कारकिर्दीत नगरपरिषद हद्दीत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आली आहेत, त्या जागेत काही गरजू आपला व्यवसाय करतात तर काहीनी जागा अडवून त्या टपर्‍या भाड्याने दिल्या आहेत, नगरपरिषदेच्या जागेवर टपरी उभी करून त्यावर भाडे कमविण्याचे काहींचा उद्योग आजही सुरू आहे.

               कर्जत शहर हे झपाट्याने वाढत असल्याने शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी एम एम आर डी ए किंवा अन्य निधीच्या माध्यमातून कर्जत मधील सर्व प्रभागात रस्त्यांची कामे होत आहेत. नगरपरिषद रस्ते करताना कोणाच्या मालकीची जागा घेत आहेत तर कधी अनधिकृत बांधकाम तोडून रस्ते मोठे करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र रस्ते विकास आराखड्याच्या नियमानुसार होत नसल्याने अनेक नागरिकांची नाराजी ऐकावयास मिळत आहे.

                 काही दिवसांपूर्वी नगरपरिषद कार्यालया समोर विठ्ठलनगर परिसरात डॉ जैन ते वैद्य यांच्या घरापर्यतच्या कामाचे कॉक्रीटीकरण करण्यात आले, मात्र या रस्त्याच्या प्रवेशद्वार च्या बाजूला दोन अनधिकृत टप-या होत्या. नगरपरिषद प्रशासनाने त्या टप-या न तोडता त्यांना अभय देऊन गटार नागमोडी वळणाचे बनवले होते. या परिसरातील एका रस्त्यासाठी मालकीच्या जागा घेऊन रस्ता रुंदीकरण करण्यात आला तर याच परिसरातील दुसर्‍या बाजूच्या रस्त्यावर अनधिकृत टपर्‍या वाचवून गटार नागमोडी वळणाची बनविण्यात आली. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांच्या मध्ये  नाराजी सूर होता.

             रस्त्याचे आणि गटाराचे काम सुरू असतानाचा नगरपरिषद प्रशासनाने अनधिकृत बांधकाम तोडले असते तर  त्या टपरी धारकाला न्यायालयात धाव घ्यायला अवधी मिळाला नसता, संबंधित व्यक्ती टपरी विषयी न्यायालयात न जाता त्या ठिकाणाहून जाणार्‍या रस्त्याबाबत न्यायायात गेला आहे ही बाब लक्षात येताच नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अखेर नगरपरिषद कार्यालया समोरील दोन अनधिकृत बांधकामापैकी एक दुकान गाळ्याचे बांधकाम  दि.13 जानेवारी रोजी तोडले होते, आणि काल  दि.16 जानेवारी रोजी सायंकाळी दुसरा अनधिकृत गाळा तोडला आहे.

               मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या धडक कारवाई मुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अशीच धडक कारवाई नगपरिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामावर व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

अवश्य वाचा

सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे.