कर्जत 

आ. जयंत पाटील यांनी ही संकल्पना प्रथम रायगड जिल्ह्यात राबविली. त्यावेळेस कर्जतमध्येही भात खरेदी केंद्र सुरु करा, भविष्यात शेतकर्‍यांना चांगला फायदा होईल असे त्यांनी सांगितले होते. कर्जत शहरात केंद्र असल्यामुळे शेतकर्‍यांना कर्जतमध्ये येणे परवड नव्हते.   जवळ केंद्र नसल्यामुळे भात पोचविता येत नव्हते. त्यामुळे योग्य भाव मिळत नव्हता. याचीच दखल घेऊन कर्जत तालुक्यातील भोईरवाडी येथे भात खरेदी केंद्र सुरु केले असून  हे केंद्र  ग्रामीण भागातील शेतकर्‍यांसाठी अधिक सोयीचे ठरेल असे शेकाप जेष्ठ नेते विलास थोरवे यांनी सांगितले. ते भात खरेदी उदघाटन प्रसंगी बोलत होते.

या कर्यक्रमाला आमदार महेंद्र थोरवे यांना आमंत्रण देऊनही न आल्याने विलास थोरवे यांनी खंत व्यक्त केली. आमदारांनी या ठिकाणी येणे गरजेचे होते परंतु त्यांना येता आले नाही. शेतकर्‍यांचे काय अडचणी आहेत ते त्यांना सांगायचे होते. संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांवर स्थानिक राजकीय पदाधिकार्‍यांचा दबाव राहिला नसल्यामुळे अधिकारी शेतकर्‍यांना जुमानत नाही. हे थांबायला हवे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. शेतकर्‍यांचे झालेले नुकसान भरपाई कर्जमाफी यासंदर्भात विचारपूस केली पाहिजे. शेतकरी हा ग्रामीण भागात राहत असून त्याचा विजेचा वापर कमी होत असताना त्याठिकाणी सात हजारापेक्षा जास्त बिल येत असल्यामुळे त्या शेतकर्‍यानी नक्की करायचे तरी काय ? अशी खंत  विलास थोरवे यांनी व्यक्त केली.

श्री खांबाया धान्य कोठी सहकारी संस्था लि. मार्केवाडी, शासकीय आधारभूत किंमत हमीभाव योजने अंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन यांच्यावतीने आधारभूत भात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या प्रसंगी सुदाम पवाळी,भात खरेदी केंद्राचे चेअरमन डी.के. देशमुख, माजी उपसभापती मनोहर थोरवे आदी उपस्थित होते .

 

अवश्य वाचा