महाराष्ट्राने ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला आहे. अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गुरुवारीही घवघवीत यश संपादन केल्यामुळे पदकतालिकेत अग्रस्थान कायम राखले आहे. महाराष्ट्राच्या खात्यात आतापर्यंत 34 सुवर्ण, 37 रौप्य आणि 57 कांस्यपदकांसह एकूण 128 पदके जमा आहेत.

वेटलिफ्टिंगमध्ये सौम्या दळवी, हर्षदा गरुड यांनी विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच सायलकिंगमध्ये महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरले. खो-खो खेळामध्ये महाराष्ट्राने गुरुवारी चारही गटांमध्ये विजय नोंदवले.

महाराष्ट्राच्या सौम्या दळवी आणि हर्षदा गरुड यांनी विक्रमी कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. मुकुंद अहिर याने सुवर्णमय कामगिरी करत वेटलिफ्टिंगमध्ये पहिल्याच दिवशी घवघवीत यश संपादन करून दिले. मुंबईच्या सौम्याने 17 वर्षांखालील गटात 40 किलो वजनी गटात 116 किलो वजन उचलत आरती तातगुंटीने गुरुवारी नोंदवलेला 115 किलो वजनाचा विक्रम मोडीत काढला. इचलकरंजीच्या आरतीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हर्षदाने 45 किलो वजनी गटात 139 किलो वजन उचलताना महाराष्ट्राच्या निकिता कमलाकर हिने गेल्या वर्षी नोंदवलेला 128 किलोचा विक्रम मागे टाकला. मनमाडच्या मुकुंद अहिरने 49 किलो गटात 184 किलो वजन उचलत सुवर्णपदक प्राप्त केले.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली