मुंबई 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी हंगामासाठी गुरूवारी वार्षिक करारबद्ध केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत भारतीय संघातील चार मुंबईकरांना संधी देण्यात आली आहे. तर प्रथमच या करारामध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला अ श्रेणीच्या करारातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून त्याला कोणत्याही श्रेणीत स्थान देण्यात आलेले नाही.

बीसीसीआयने कराराबद्ध केलेल्या खेळाडूंमध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याला समाविष्ट करण्यात आले आहे. सर्वाधिक मानधन घेणार्‍या तीन खेळाडूंच्या यादीत त्याला स्थान देण्यात आले आले.बीसीसीआयच्या वार्षिक कराराचे चार भाग आहेत. -+, -, इ आणि उ अशा चार विभागात हा करार करण्यात आला आहे. त्यापैकी -+ करारात रोहितला स्थान मिळाले आहे. त्याला प्रतिवर्ष 7 कोटी इतके मानधन मिळणार आहे.

त्या खालोखाल - श्रेणीतील खेळाडूंना प्रतिवर्ष 5 कोटी रूपये मानधन मिळणार आहे. या श्रेणीत मुंबईकर अजिंक्य रहाणेला संधी मिळाली आहे. इ श्रेणीत कोणत्याही मुंबईकराला स्थान देण्यात आलेले नाही, पण उ श्रेणीमध्ये शार्दूल ठाकूर आणि श्रेयस अय्यर यांना स्थान देण्यात आले आहे. या खेळाडूंना प्रतिवर्ष 1 कोटी मानधन मिळणार आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली