राजकोट 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार फिंच यांनी नाबाद द्विशतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. यानंतर राजकोटच्या मैदानावर दुसर्‍या वन-डे सामन्यातही, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि शिखर धवन या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतकी भागीदारी केली.भारतीय संघाचा उपकर्णधार, हिटमॅन रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून आणखी एक पराक्रम केला आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध राजकोट येथे सुरू असलेल्या सामन्यात रोहितने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने सात हजार धावा केल्या. केवळ 137 डावांमध्ये रोहितने ही कामगिरी केली. 

या क्रमवारीत रोहीत ने दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम अमला आणि भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले. या विक्रमात सचिन, आमलासह तिलकरत्ने दिलशान आणि सौरव गांगुली हे अव्वल पाचात आहे.  दरम्यान, रोहितने या सामन्यात 18 वी धाव घेताच त्याने वनडे क्रिकेटमधील सर्वात वेगाने 7 हजार धावांचा विक्रम केला.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली