नवी दिल्ली

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. या संदर्भातल दिल्ली कोर्टाने नवं डेथ वॉरंट जारी केलं आहे. दिल्ली कोर्टाने आधी दिलेल्या डेथ वॉरंटनुसार 22 जानेवारीला निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यात येणार होतं. मात्र डेथ वॉरंटला आव्हान देण्यात आलं ज्यानंतर 22 तारखेचं डेथ वॉरंट रद्द करण्यात आलं होतं. आता दिल्ली न्यायालयाने नवं डेथ वॉरंट जारी केली आहे. या डेथ वॉरंटनुसार 1 फेब्रुवारीला निर्भयाच्या दोषींना फाशी दिली जाणार आहे. सकाळी 6 वाजता ही फाशी दिली जाणार आहे.

 निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली आहे. यामुळे मुकेश सिंह याला फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुकेश सिंह याने राष्ट्रपतींकडे मंगळवारी दयेचा अर्ज केला होता. तत्पूर्वी त्याने आपल्याला ठोठावण्यात आलेली शिक्षा कमी करावी अशी विनंती सुप्रीम कोर्टाकडे केली होती. त्याची ही विनंतीही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली होती.

 पतियाळा हाऊस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याच्या याचिकेवरील सुनावणीत म्हटले की, या प्रकरणीतील दोषींना 22 जानेवारीला फाशी देता येणार नाही असे पतियाळा हाऊस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात म्हटले होते. दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज प्रलंबित असल्याने फाशी देता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते. दयेचा अर्ज प्रलंबित असल्यानंतर डेथ वॉरंटवर आपोआप स्थगिती येते. हे लक्षात घेता फाशी देण्याची नवी तारीख काय असेल, हे तुरुंग प्रशासनाच्या उत्तरानंतर ठरणार आहे.

  दिल्ली सरकारने  गुरुवारी निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज फेटाळून लावला होता. या प्रकरणातील चारही दोषींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या सर्व दोषींना 22 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता फाशी दिली जावी असा निर्णय पतियाळा हाऊस कोर्टाने दिला. त्यासाठी कोर्टाने 7 जानेवारीला डेथ वॉरंट जारी केला होता. त्यानंतर यापैकी एक दोषी मुकेश सिंह याने तिहार तुरुंगातून दयेचा अर्ज केला होता.

 कडक सुरक्षा बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेर  असूनही निर्भयातील दोषी विनय शर्मा याने तिहार तुरुंगात फास आवळून आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळचा हा प्रकार असल्याचे विनय शर्माचे वकील ए. पी. सिंह यांचा दावा आहे. मात्र, तुरुंग महासंचालक संदीप गोयल यांनी या घटनेचा इन्कार केला. सूत्रांनुसार, विनय याला वैद्यकीय निगराणी कक्षात चोवीस तास ठेवण्यात आले आहे. दरम्यान, दोषी मुकेश कुमारचा दयेचा अर्ज प्रलंबित असल्याने चौघांची 22 तारखेची फाशी टळण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली