ऑस्ट्रेलिया 

ऑस्ट्रेलिया ओपनच्या मुख्य फेरीत स्थान मिळविण्यात भारताचा प्रजनेश गुन्नेस्वरन अपयशी ठरला. शुक्रवारी क्वालिफायरच्या अंतिम फेरीत त्याचा लाटव्हियाच्या अर्नेस्ट गुलबिसकडून पराभव झाला. प्रजनेशच्या खेळीसोबतच भारताचे एकेरीत पॅकअप झाले आहे.  जागतिक  क्रमवारीत 122 व्या क्रमांकाच्या प्रजनेशचा पात्रता गटात 17 व्या मानांकित गुलबिसने 7-6 (2), 6-2 असा पराभव केला. भारतीय खेळाडूंनी यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा वाईल्ड कार्ड खेळाडू हॅरी बोर्शीयर आणि जर्मनीच्या यॅनीक हॅनफॅमॅनला पराभूत केले होते. 

प्रजनेश पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपनच्या एकेरी सामन्यात भारतीयांचे आव्हान संपुष्टात आले. पहिल्या सेटमध्ये तो अधिक चांगला खेळला. ही चढाओढ टायब्रेकरपर्यंत पोहोचली. परंतु दुसर्या सेटमध्ये तो आपल्या लयमध्ये दिसला नाही. प्रजनेशच्या या खेळीमुळे एक तास 20 मिनिटांत गुलबिसने सामना जिंकला.

प्रजनेशपूर्वी मंगळवारी क्वालिफायरच्या पहिल्या फेरीत सुमित नागलचा इजिप्तच्या मोहम्मद सफवतने पराभव केला. त्याचवेळी रामकुमार रामनाथनलाही पराभवाला सामोरे जावे लागले होते. अंकिता रैनाही महिला एकेरीत मुख्य फेरीत स्थान मिळविण्यात अपयशी ठरली.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली