उरण

 सचिन तांडेल  मेमोरियल फाऊंडेशन कळंबुसरे आणि तेरणा ब्लड बँक नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या द्वितीय वर्धापनदिननिमित्त म रक्तदान शिबिर कळंबुसरे येथे आयोजित करण्यात आलेले होते.या रक्तदान शिबिरात एकूण 28 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ..प्रकाश मेहता यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि श्रीफळ वाढवून केले .तसेच या कार्यक्रमास प्रमुख अतिथी   मिलिंद खारपाटील ,नवी मुंबई पोलीस सौ. सुप्रिया ठाकूर, कस्टम आयुक्त . शंकर बिराजदार  प्रा. प्रीतम टकले, बुद्धीबळ च्या आंतरराष्ट्रीय पंच सौ.मंगला बिराजदार  ,आदर्श शिक्षिका सौ. शारदा खारपाटील ,हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे,  ब्लड बँक नेरुळ चे डॉ. संजय कापसे तसेच त्यांचे सर्व स्टाफ  त्याच बरोबर कळंबुसरे  गावच्या सरपंच सौ. नूतन नाईक, उपसरपंच श्री. सुनील पाटील तसेच कळंबुसरे  ग्रामपंचायत सर्व सदस्य, सदस्या, कळंबुसरे गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहिले .पत्रकार मिलिंद खारपाटील यांनी  आतापर्यंत 26 वेळ  रक्तदान केल्याबद्दल त्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. रक्तदात्याना प्रमाणपत्र ,तुळशीचे रोप आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली