बारामती 

महिलांची छेड का काढतो, असा जाब विचारल्याच्या रागातून पारधी समाजातील तरूणाने महिला सरपंचाच्या पतीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. बारामती तालुक्यातील सोनगांवात बुधवारी ही धक्कादायक घटना घडली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गावातील महिला सोनेश्‍वर मंदिरात ओवासण्यासाठी जमा झाल्या होत्या. यावेळी मंदिरात उपस्थित टोळक्यातील एक तरूण महिलांची छेड काढत होता. सोनगांवच्या सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज थोरात हे त्याठिकाणी होते. हे दृष्य पाहिल्यानंतर युवराज यांनी त्या पारधी समाजातील तरूणाला जाब विचारला. त्यावरून चिडून त्या तरूणानं धारधार शस्त्रानं सपासप वार केले. या हल्यात थोरात हे जागीच ठार झाले.

पारधी समाजातील तरूणाने हत्या केल्यामुळे गावात खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. संतप्त जमावाने गावातील पारधी समाजाची दहा ते बारा घरे पेटवली आहेत. तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस चौकशी करत आहेत.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली