अलिबाग 

जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत वार्षिक आराखड्यातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला असून  जिल्हा नियोजन समितीचा निधी यंत्रणाकडून वेळेत खर्च होणे अपेक्षित आहे, असे निर्देश राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा   आदिती तटकरे यांनी दिले. 

जिल्हा नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीस पालकमंत्री श्रीमती तटकरे यांच्यासह खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे,अलिबाग नगर  परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव तसेच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या की, शासनाच्या विविध विभागांमार्फत लोकहिताच्या नाविण्यपूर्ण योजना राबविण्यात येत असतात.  या योजनांना जिल्हा नियोजनकडून निधीची उपलब्धतता करुन दिली जाते.  यासाठी विकास कामांना गती देण्याकरिता जिल्हा नियोजनकडून उपलब्ध करुन दिलेला निधी विहित मुदतीत खर्च झाला पाहिजे.    जिल्हा नियोजनचा निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा सातत्याने अग्रेसर राहिला आहे.  सन 2019-20 करिता शाळा, अंगणवाडी दुरुस्तीच्या  कामांना प्राधान्य देऊन पावसाळा सुरु होण्यापूर्वी दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच जिल्ह्यातील पुलांचेही स्ट्रक्च्लर ऑडिट होणेही आवश्यक आहे. बैठकीचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी केले.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली