म्हसळा 

वारळ येथील दत्त मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिले.

म्हसळा तालुक्यातील वारळ हे गाव प्रसिद्धी झोतात येण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथे नदी पात्रात  निर्माण झालेलं श्री गुरुदत्तांचे स्वयंभु स्थान. 1972 साली साक्षात्कार देऊन गुहेत अंतर्धान पावलेल्या या स्वयंभु क्षेत्री प्रतिवर्षी दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्ती भावात आणि उत्साहात साजरा केला जातो.हजारो भक्त या ठिकाणी येऊन श्री दत्त गुरूंची मनोभावे पूजाअर्चा करून दर्शन घेतात.आंतरराष्ट्रीय दिघी बंदरापासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या या मंदिरापासून दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरही अगदी काही अंतरावर आहे.

चोहोबाजूंनी डोंगर आणि मध्येच असलेल्या भव्य नदीपात्रात निर्माण झालेल्या या स्वयंभु स्थानी मंदिर निर्माणाचा संकल्प स्वयंभू गुरुदत्त मंडळाने घेतला असून नुकतेच दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर आम.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते या मंदिराचे भूमीपूजनही झाले.स्वयंभू गुरुदत्त मंडळ वारळ या मंडळाचे सर्व सदस्य हे अतिशय मेहनती असून या मंदिराची जागरूकता सातत्याने राहावी म्हणून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.ते व्यवसायानिमित्त जरी मुंबईला तरी त्यांची अवस्था मात्र घार फिरते आकाशी तिचे चित्त मात्र पिलापाशी अशी आहे.या मंदिरास पर्यटनाचा दर्जा मिळावा या साठी मंडळाचे अध्यक्ष रुपेश पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य आणि मान्यवर ग्रामस्थ यांचे प्रयत्न सुरु असून दिनांक 14 जानेवारी 2020 रोजी मंत्रालयात जाऊन राज्याच्या पर्यटन,उद्योग आणि क्रीडा राज्यमंत्री तथा पालक मंत्री रायगड आदिती तटकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन श्री दत्त मंदिरास पर्यटनाचा दर्जा मिळावा यासाठी निवेदन दिले. नाम. आदिती ताई तटकरे यांनी निवेदनाचा स्वीकार करताना सांगितले की वारळ या गावास खर्‍या अर्थाने निसर्गाचे देणे असून वारळ येथील श्री दत्त मंदिरास पर्यटनाचा दर्जा देण्यासाठी निश्‍चित पणे प्रयत्न करून वारळ गावाचे वैभव वाढविण्याचाही माझा प्रयत्न असेल. याप्रसंगी त्यांच्या समवेत उपाध्यक्ष विजय पाटिल, सचिव वैभव चाळके आणि संजय माळी,खजिनदार जनार्दन पाटिल आणि संतोष पाटील,सल्लागार बाळकृष्ण चाळके आणि रविकुमार धुमाळ,मार्गदर्शक अशोक धुमाळ,बाळाराम म्हात्रे त्याचप्रमाणे संपर्क प्रमुख उदय धुमाळ,रुपेश चाळके उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली