नवी दिल्ली

निर्भया बलात्कार प्रकरणात सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह (पुनर्विचार) याचिका सुप्रीम कोर्टानं आज फेटाळली. त्यामुळं निर्भयाच्या दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर 22 जानेवारीला अंमलबजावणी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

 पतियाळा हाऊस कोर्टानं दोषींना डेथ वॉरंट जारी केल्यानंतर दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह या दोघांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्या. एन. व्ही. रमण्णा, न्या. अरुण मिश्रा, आर. एफ. नरीमन, आर. भानुमती, न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठानं एकमतानं दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. 

 निर्भयाचा गुन्हेगार विनयनं दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेत सामाजिक-आर्थिक परिस्थिती, त्याचे आजारी असलेले आई-वडील आणि कुटुंबातील अवलंबून असलेल्या व्यक्ती, तुरुंगातील चांगले वर्तन आणि त्यात सुधारण्याची शक्यता आदींचा विचार केला गेला नाही आणि त्यामुळं न्याय झाला नाही, असं म्हटलं होतं. 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली