माणगाव 

निजामपूर भागात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.  भविष्यात विविध कारखाने निजामपूर भागात आणून मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही खा. सुनिल तटकरे यांनी भाले येथील भव्य जाहीर सत्कार व उद्धाटन समारंभात बोलताना दिली.

ग्रुपग्रामपंचायत भाले व हौदाची अळी भाले आयोजित खा. सुनिल तटकरे व ि आ. अनिकेत तटकरे यांचा जाहीर सत्कार राष्टवादी कॉ. पक्षाचे निजामपूर विभागीय अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. 

त्यावेळी भाले ग्रामपंचायत हद्दीतील हौदाची आळी येथे सामाजिक सभागृह व भाले आदिवाशी वाडी येथिल अंगणवाडी इमारतीचे खा. सुनिल तटकरे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले.  यावेळी व्यासपीठावर निजामपूर ग्रा.प. सरपंच राजाभाउु रणपिसे, जेष्टनेते माधवराव बक्कम, राष्टवादी कॉ. महिला तालुका अध्यक्षा संगिता बक्कम, रायगड जिल्हा राष्टवादी युवक कॉ. माजी उपाध्यक्ष अनंत महाडीक,  माजी उपसभापती तुकाराम सुतार, माजी जि.प. सदस्य चंद्रकांत गोपाळ, कृ.उ.बा. उपसभाती बाळाराम दबडे, भाले सरपंच विवेक खानविलकर, उपसरपंच सुजाता महाडीक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, युवानेते योगेश निजापकर, संदिप जाधव, संजय गुळांबे, भागाड ग्रा.प. सरपंच प्रकाश जंगम, निजामपूर माजी सरपंच हमजा जालगावकर तसेच विभागातील सर्व सरपंच, उपसरपंच तसेच विविध पदाधिकारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी खा. तटकरे म्हणाले की, निजामपूर भागाने माझयावर भरभरुन प्रेम केले त्यामुळे मी निजामपूर भागाच्या विकासाला नेहमीच झुकत माप दिले.  मागील पाच वर्षाच्या काळात सत्ता नसतानाही विकास कामे केेली.  आता तुमच्या आशिर्वादाने आदिती पालकमंत्री झाली.  शरद पवारांच्या आशिर्वादाने आदिती तटकरेेंकडे अद्योग खाते आले त्यामुळे निजामपून विभागात आगामी काळात विविध कारखाने उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  मात्र या भागात एकही प्रदुषन विरहीत कारखाना उभारला जाणार नाही असाही त्यांनी ठाम विश्‍वास दिला.   पालकमंत्री आदिती तटकरे या आजच्या कार्यक्रमाला येणार होत्या मात्र मुख्यमंत्र्यांनी  तातडीने बैठक बोलावल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही.  मात्र ही बैठक एमआयडीसी. सदर्भात विविध उद्योगधंदे आणण्यासाठी असल्यामुळे आगामी काळात या भागात मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील, अशी ग्वाही दिली. 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली