बेळगाव

सीमाभागात शांतता नांदू द्यायची नाही असा चंगच कन्नड संघटनांनी बांधला आहे.सीमाभागातील साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील नेते मंडळी आणि साहित्यिक येऊन प्रक्षोभक भाषण करून सीमाप्रश्न उकरून काढत आहेत.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील नेते मंडळी आणि साहित्यिकांवर कारवाई करावी अशी मागणीबेळगाव जिल्हा  कन्नड कृती संघटनेने केली आहे.महाराष्ट्रातील नेते मंडळी आणि साहित्यिकांना कर्नाटकात प्रवेश करण्यास बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मराठी साहित्य संमेलनामुळे सीमाभागात अशांतता निर्माण होत आहे.महाराष्ट्रातील नेते आणि साहित्यिक बेळगावमध्ये येऊन कर्नाटक आणि कन्नड भाषेबद्दल प्रक्षोभक वक्तव्ये करत आहेत.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सीमाभागात चाललेल्या कर्नाटक आणि कन्नड विरोधी कारवाया थांबवण्यायासाठी कर्नाटकचे 

गृहमंत्री बसवराज बोंमाई यांनी बेळगावला त्वरित भेट देऊन चर्चा करून जिल्हा प्रशासनाला कारवाई करण्यासाठी पाठबळ द्यावे अशीही मागणी करण्यात आली आहे.

गृहमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या तर्फे निवेदन पाठविण्यात आले असून आयजीपी राघवेंद्र सुहास आणि डीसीपी सीमा लाटकर यांचीही बेळगाव जिल्हा कन्नड कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली.कृती समिती अध्यक्ष अशोक चंदरगी,बी तिप्पेस्वामी ,शिवाप्पा शरमंत,सागर बोरंगल आणि कार्यकर्त्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली