माणगाव तालुक्यातील अचानक महिला बचत गट मूठवली तर्फे निजामपूर येथील महिला सभागृह या कामाचे उदघाटन समारंभ रायगडचे खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते व रायगड जिल्ह्याच्या नवनिर्वाचित पालकमंत्री आदिती तटकरे यांचा भव्य जाहीर सत्कार आज मंगळवार दि. 14 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता आ. अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबूशेट खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली  मूठवली तर्फे निजामपूर याठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे  चिटणीस प्रभाकर उभारे, जेष्ठ नेते राजाभाऊ रणपिसे, माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष केकाणे. महिला आघाडी तालुका अध्यक्षा संगीता बक्कम, शेखरशेट देशमुख,चंद्रकांत गोपाळ, तुकाराम सुतार, पानसई विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भिकूशेट धाडवे, महादेव बक्कम,दीपक जाधव, काका नवगणे.संदेश मालोरे,दिनेश महाजन, उदय अधिकारी,पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर,अलका जाधव , अलका केकाणे,सुरेश वाघ, बाळा खातू, दत्ता पाटील,अविनाश मांडवकर, सहादेव बक्कम, गणेश पवार, बाळाराम दबडे, मिलिंद खानविलकर,सुनील तेलंगे,समीर मेहता यांच्यासह तालुक्याचे अनेक कार्यकर्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.