नवी दिल्ली 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ङ्गआज के शिवाजी -नरेंद्र मोदीफ असं पुस्तक लिहिण्यात आलं असून, या पुस्तकाचे भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तकावरून वादंग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर यावरून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीही केली जात आहे.

भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणार्‍या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी भाजपाचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारींसह भाजपाच्या नेत्यांची उपस्थिती होती. जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांनीच या पुस्तक प्रकाशनाची माहिती ट्विट करून दिली होती.

संतप्त प्रतिक्रियांचा पाऊस

या पुस्तक प्रकाशनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय आहेत. त्यांच्याशी तुलना होऊ शकणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही. या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सोशल माध्यमातून केली जात आहे.

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.