सोलापूर 

सोलापूर जिल्हा परिषेदतील मोहिते -पाटील गटाच्या राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन करण्यात (डेश्रर्रिीी पलि नझ ाशालशी र्डीीशिपीळेप)  आलं आहे. यामध्ये मोहिते-पाटील कुटुंबातील दोन सदस्यांसह सहा जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. या जिल्हा परिषद सदस्यांनी पुरेसे संख्याबळ असतानाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान न करता भाजप आणि समविचारी आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं. पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत या सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आलं आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी 31 डिसेंबरला मतदान झाले होते. यात पुरेसे संख्याबळ असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला होत. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 6 सदस्यांनी विरोधी गटाला मतदान केले होते. सहा सदस्यांनी विरोधी गटाला मतदान केल्याने राष्ट्रवादी आणि महाविकासआघाडीचा प्रयत्न फसला.

जिल्हा परिषदेतील मतदानात या सहा सदस्यांनी भाजप आणि महाविकासआघाडीच्या उमेदवाराला मतदान केले. निलंबित केलेले सर्व सहा सदस्य हे माळशिरस तालुक्यातील असून स्वरूपाराणी मोहिते, शीतलदेवी धैर्यशील मोहिते, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले, अरुण तोडकर, गणेश पाटील या सदस्यांचा यात समावेश (डेश्रर्रिीी पलि नझ ाशालशी र्डीीशिपीळेप)  आहे.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.