थिरकवाँ ः उस्ताद अहमदजान

दिनांक 13 जानेवारी 2020

इतर दिनविशेष :

* 1905 - जुन्या पिढीतील ख्यातनाम नाट्य-चित्र अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म.

* 118 - म. गांधीजींनी जातीय ऐक्यासाठी उपोषणास प्रारंभ केला.

* 1949 - भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म

* 1957 - ज्ञानेश्‍वराच्या साहित्याचे गाढे अभ्यासक, भाष्यकार पांडुरंग ज्ञानेश्‍वर कुलकर्णी यांचे निधन.

* 1967 - प्राच्य विद्या पंडित, वेदांचे अभ्यासक, संस्कृत, प्राकृतचे अध्यापक हरी दामोदर वेलणकर यांचे निधन.

* 1976 - प्रसिद्ध तबलावादक थिरखवाँ उस्ताद अहमदखान यांचे निधन.

* 1996 - पारखे उद्योग समूहाचे संस्थापक बाबूराव पारखे यांचे निधन.

* 1999 - ख्यातनाम बालकुमार साहित्यिक शं. रा. देवळे यांचे निधन.

* 2000 - सतारवादक अब्दूल करीम खाँ यांचे निधन.

 

खरे तर, ‘थिरकवाँ’ हे काही त्यांचे आडनाव नाही. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना मेरठजवळील उस्ताद मुनिरखाँकडे तबला शिकण्यास नेले. उस्ताद मुनिरखाँनी व्याला तबला किती वाजवता येतो हे पाहण्यासाठी काही वाजवण्यास सांगितले. तबल्यावर त्याने थिरक...थिरक... हे बोल अतिशय स्वच्छ रीतीने वाजवले. तबल्यावरील त्याच्या बोटांचे जलदगतीने थिरकणारे नृत्य पाहून उस्ताद मुनिरखाँ थक्क झाले. त्या वेळेस तेथे उस्ताद मुनिरखाँचे वडील उस्ताद कालेखाँही उपस्थित होते. उस्ताद कालेखाँ म्हणाले, ‘देखो इस बच्चे का हात लय में कैसा भिरकता है!’ तेव्हापासून त्यांना लोक ‘भिरकू’ म्हणू लागले. पुढे भिरकूचा थिरकवा झाला. आपले गुरू उस्तान मुनिरखाँमुळे.

13 जानेवारी प्रसिद्ध हिंदुस्थानी तबलावादक ‘थिरकवाँ’ अहमदखान यांचा स्मृतीदिन. उस्ताद थिरकवाँचा जन्म उत्तर प्रदेशातील मुरादाबाद या गावात इ.स. 1880 मध्ये झाला. आईचे वडील आणि वडिलांचे वडील या दोन्ही घराण्यांकडून संगीताचा वारसा त्यांना लाभला होता. त्यांचे आजोबा (आईचे वडील) उस्ताद कलंदर बक्ष एक नामवंत तबलावादक. थिरकवाँचे दोन्ही मामाही उत्तम तबलावादक. त्यांचे काका शेरखाँ हेही तबलावादक, तर वडील हुसेन सारंगीवादक. त्यामुळे खानसाहेबांचे घर एक संगीत मंदिरच होते. आपल्या मुलाचा तबल्याचा कल पाहून वडिलांनी त्यांना उस्ताद मुनिरखाँ यांच्याकडे पाठवले. जवळ-जवळ दोन तपांपेक्षा जास्त वर्षे (26 वर्षे) कठोर तपश्‍चर्या केल्यावर तबल्यातले विशेष बारकावे, विविध शैली त्यांनी आत्मसात केल्या. उस्ताद मुनिरखाँमुळे त्यांना लखनौ, फरुकाबाद, दिल्ली, अजराडा या चार घराण्यांचा बाज मिळाला. गुरू मुनिरखाँ यांनी विविध घराण्यांची तबलावादनाची शैली जाणून स्वतःची एक नवी शैली आत्मसात केली होती. थिरकवाँना या विविध घराण्यांचा बाज मिळाल्यामुळे आपल्या गुरुप्रमाणे तेही तबलावादनात प्रवीण झाले. रामपूरच्या नवाबांनी त्यांना आपल्या पदरी ठेवले होते.

हिंदुस्थानातील जवळ-जवळ सर्वच श्रेष्ठ दर्जाच्या गवयांबरोबर थिरकवाँ थिरकले. महाराष्ट्र आणि थिरकवाँ यांचे नाते तर कोयरीतल्या हळदीकुंकवाप्रमाणेच आहे. मराठी रंगभूमीवरचे स्वप्न असलेल्या बालगंधर्वांच्या आवाजाला साथ होती थिरकवाँच्या तबल्याची. मराठी रसिक गंधर्वाच्या नाटकाला थिरकवाँच्या तबल्याची साथ ऐेकायला खास येत असे. त्या काळात नट, गायक, वादक या कलाकारांच्या कलेचे कौतुक फक्त कलामंदिरात होई. समाजात तिची अवस्था पांढरी साडी आणि भुवया व डोक्याचे मुंडन केलेल्या विधवा स्त्रीसारखी होती. याची खंत भातखंडेप्रमाणेच अहमदजानलाही होती. आणि म्हणूनच भातखंडेच्या संगीत विद्यालयात ते तबला वादनाचे प्राध्यापक म्हणून काम पाहू लागले. महाराष्ट्रात तबलावादनाच्या प्रसारात थिरकवाँ यांचा फार मोठा वाटा आहे.

तबल्यातील गणिती लयकारीवर हुकूमत असूनही वादनातील लयदारपणा व सुरेलपणा कायम ठेवणार्‍या थिकवाँनी आपले तबलावादन कलात्मक उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे मैफलीत गवयाप्रमाणे मध्यवर्ती असे स्वतंत्र स्थान तबला या वादनाला सबंध भारतभर त्यांनी मिळवून दिले. लखनौच्या मॉरियस म्युझिक कॉलेजमध्ये तबलावादनाचे शिक्षण देणारे थिरकवाँ अखेरपर्यंत तबल्याच्या प्रचारासाठी कार्यरत राहिले. त्यांच्या या कार्याचे कौतुक 1970 रोजी भारत सरकारने ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन केले. त्यांच्या अखेरच्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या. एक होती, मृत्यू लखनौमध्येच व्हावा आणि दुसरी अखेरचा श्‍वास शिल्लक असेपर्यंत तबला चांगला वाजवता यावा. वयाच्या 90 व्या वर्षीही थिरकवाँची बोटे वयाच्या दहा वर्षांसारखीच थिरकत होती.

दि. 13 जानेवारी 1176 रोजी तबल्याची बोटे कयमचीथिरकली! आजच्या संगीत शिक्षण घेण्यार्‍या पिढीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन ठराव्यात अशा त्यांच्या ऑडिओ, व्हिडिओ कॅसेट बाजारात आहेत, तसेच वाडिया यांनी खानसाहेबांच्या जीवनावर लघुपटाचीही निर्मिती केली आहे.