मुंबई
 राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांच्याकडील मदत आणि पुनर्वसन खातं कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. दुय्यम दर्जाचे खाते मिळाल्याने वडेट्टीवार नाराज होते. त्यामुळे त्यांना भूकंप पुनर्वसनऐवजी मदत पुनर्वसन खातं दिलं जाणार आहे. त्यांनी शुक्रवारी आपला पदभार स्विकारला.
काँग्रेसचे नाराज कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांची समजूत काढण्यात अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना यश आले आहे. दिल्लीतील नेत्यांशी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलणं करुन दिल्यानंतर वडेट्टीवारांच्या नाराजीचा तिढा सुटला.
माझ्या नाराजीचा विषय नव्हता. काँग्रेसच्या वाट्याला आलेलं खातं शिवसेनेकडे गेले होतं. मदत आणि पुनर्वसन हे सर्वसामान्य माणसाशी संबंधित खाते आहे. ते शिवसेनेकडे गेले होते असे विजय वडेट्टीवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
विजय वडेट्टीवारांना ओबीसी, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, मदत पुनर्वसन या खात्यांचं कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं
 
 
 
 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.