दिनांक 11 जानेवारी 2020 

जागतिक हास्य दिन इतर दिनविशेष :

1) 1815- ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ ला- यू लाँरेन डी यांचा जन्म. 2) 1825 - ब्रिटिश गणितज्ञ  आणि पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ विल्यम स्पॉटिसवूड यांचा जन्म. 3)1858-1857 च्या रणसंग्रामातील सेनानी तात्या टोपे - इंग्रज यांच्यात शेवटची लढाई या दिवशी झाली. 4)1859 - व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांचा जन्म. 5)1898 - मराठीचे ज्येष्ठ लेखक, ‘ययाती’ कार वि. स. खांडेकर यांचा जन्म. 6) 1110- साहित्यसम्राट न. चिं. केळकर ‘केसरी’ चे संपादक झाले. 7 ) 1915 - मराठी उपहास काव्याचे जनक गंगाधर रामचंद्र मोगरे यांचे निधन.

ते  बारा-तेरा वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले. त्यांना पुढचे शिक्षण घ्यायचे होते. पण घरात अठरा विश्‍वे दारिद्र्य. तेव्हा पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी चुलत्याने मांडलेला दत्तक प्रस्ताव स्वीकारला आणि गणेश आत्मारामचा विष्णू सखाराम खांडेकर या नव्या नावाने पुनर्जन्म झाला. विष्णूचा जन्म 11 जानेवारी, 1898 रोजी सांगली या कर्मठ गावात झाला. घरातील वातावरणही कर्मठ. 1916 साली चुलत्याने दत्तक घेतल्यामुळे ते कोकणात आले. तेव्हा तेथील दारिद्रय पाहिले, चुलता म्हणजे ‘मोठ्या घरचा पोकळ वासा’  निघाला. शाळेच्या फीचे पैसे देण्यासाठी तो टाळाटाळ करीत असे. अशा प्रतिकूल परिस्थितीत ‘मी कसा घडलो’ या आत्मकथनात ते सांगतात, वाचन, नाटक याचे मला विलक्षण वेड होते. कॉलेजात गडकरर्‍यांचा  सहवास लाभला. माइ्या कविता त्यांनी मला ‘जाळून टाक’ म्हटल्यावर मी त्या जाळल्या, कारण त्या अगदी कच्चा  कैर्‍यांसारख्या होत्या. पुढे लेखक, नाटककार व्हायचे ठरवले. तथापि शिराळ्यात शिक्षक म्हणून गेल्यावर लेखणीलाच कलाटणी मिळाली.

सावंतवाडीजवळील शिरोळे गावात 12 एप्रिल, 1920 रोजी शाळेत मास्तर म्हणून खांडेकर रुजू झाले. तेथील दुःखाने त्यांना सामाजिक प्रेरणा दिली. ही दुःखे जगाला कळली पाहिजेत म्हणून ती लिहिली पाहिजेत. याची जाणीव त्यांना झाली व त्यांच्यातला लेखक जागा झाला. मराठी साहित्यातील कथा, कविता, कादंबर्‍या, ललित निबंध, टीकावाङ्मय, नाटक, चित्रपट, पटकथा या सर्व क्षेत्रांत ते बुद्धिबळातल्या वजिरासारखे चालेले.112 पुस्तके त्यांनी लिहिली. 1930  ते 42 या 12 वर्षात त्यांनी 12 कादंबर्‍या लिहिल्या. ‘हृदयाची हाक’ ही त्यांची पहिली कादंबरी. प्रीतीविना जीवन दुःखमय आहे, हा कादंबरीचा आशय. 

या पहिल्याच कादंबरीमुळे  ते कादंबरीकार या पदावर पोहोचले ‘कांचनमृग’ मध्ये माणूस वस्तूचे खरे स्वरुप लक्षात न घेता तेच खरे कांचन मानून त्याच्या मागे धावतो आणि फसतो ही कल्पना स्पष्ट केली आहे. ‘उल्का’ आणि ‘दोन ध्रुव’ या कादंबर्‍यातून त्यांनी त्या काळाचे चित्रण केले आहे. ‘उल्का’ मध्ये उल्काचा विधुर जमीनदाराशी झालेल  विवाह व त्याचा मृत्यूअसे कथानक आहे. तर ‘दोन ध्रुव’ मध्ये ‘आहे रे’ हा श्रीमंताचा वर्ग  आणि ’नाहीर रे ह गरिबांचा वर्ग असा संघर्ष आहे. ‘क्रौंचवध’ यात गांधीवाद, तर ‘हिरवा चाफा’ मध्ये त्यांनी समाजातील मध्यमवर्गाच्याही असलेल्या काही जबाबदार्‍या दाखवल्या आहेत. तसेच ‘पांढरे ढग’ मध्ये तत्वशून्य मध्यमवर्गाचे चित्रण केले आहे.

त्यांच्या ‘ययाति’ या कादंबरीमुले मराठी कादंबरी हा विषय सार्‍या देशभर चर्चेला जाऊ लागला. भारतीय साहित्यातील सर्वश्रेष्ठ असा ज्ञानपीठ पुरस्कार ‘ययाती’मुळे त्यांना प्राप्त झाला. ‘ययाति’ ही पुराणकाळातील कथा असून नायक ययाति हा जेवढा अतृप्त आहे त्यापेक्षाही आजचा माणूस वासनेने वखवखलेला आहे. त्याला संयम आणि विवेक शिकवायला हवाय हेच त्यांना दाखवायचे आहे. गांधीयुगाने खांडेकर भारावले होते. 

तथापि मार्क्सवादही त्यांना भुरळ घालत होता. मार्क्सवाद व गांधीवाद यांचा समन्वय झाला तर समाज सुखी होईल, असे त्यांना वाटत होते. सरकारी नोकरीमुळे प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला नव्हता. तथापि त्यांच्या साहित्यामुळे देशभक्तांची एक नवी पिढीच तयार झाली. स्वातंत्रयसैनिक ग. प्र. प्रधान त्यापेकी एक ‘त्यांच्यासाहित्याने आमची मने श्रीमंत केली आहेत,’ असे कुसुमाग्रजांनी म्हटले आहे.

आचार्य अत्र्यांनी त्यांच्या नऊ पैलूंचे सुंदर विवेचन ‘दुर्गा आणि फुले’ यामध्ये केले आहे. विनोदी लेखक, कवी, लघुकथाकार, नाटककार, कादंबरीकार, टीकाकार, चित्रपट लेखवक, लघुनिबंधकार व उत्तम वक्ता हे होय. खांडेकरांनी राम गणेश गडकर्‍यांचा शब्द खरा कन दाखवला. गडकर्‍यानी  ‘राजसंन्यास’ हे णाटक फ्रेंच भाषेतून चोरले असा आरोप खांडेकरांनी गडकनर्‍याच्या तोंडावर केल्यावर ते मह्णाले, माइ्यावर चोरीचा आरोप करायला हा भीत नाही, हा आयुष्यात काहीतरी करून दाखवणार. आणि खरोखरच मराठी साहित्यात स्वतः:चे असे अढळ स्थान निर्माण करुन साहित्याचा हा भीष्माचार्य 2 सप्टेंबर, 1976 रोजपंचतत्वत्त विलीन झाला.