अलिबाग 

मुलांमधे असलेले सुप्त नाट्य गुण वृद्धिंगत करण्यासाठी चेंढरे कला- सांस्कृतिक मंडळ आणि रंगसेवा, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बाल नाट्य प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास शिबिराचे दि. 12 जानेवारी  पासून दर शनिवार व रविवारी चेंढरे येथे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर पूर्णपणे विनामूल्य असून फक्त चेंढरे येथील चौथी ते दहावी पर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांकरिता आयोजित केले आहे. 

तब्बल 30 वर्षांचा सखोल व अभ्यासु नाट्यानुभव तसेच 12 वर्षांच्या नाट्य प्रशिक्षणाचे अनुभव असलेले सागर नार्वेकर आणि किशोर म्हात्रे आपल्या सहकाऱयांसह ही कार्यशाळा घेणार आहेत. यामध्ये प्रत्येक बाल कलाकारांना कायिक आणि वाचिक अभिनयाचे धडे दिले जातील. त्याच बरोबर लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, वेशभुषा, रंगभूषा आदि तांत्रिक बाबींचे प्रात्यक्षिकासह शास्त्रशुध्द प्रशिक्षण दिले जाईल. मुलांचे नाट्यमय कार्यक्रम व बालनाट्य बसवून त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावरील नाट्य प्रयोगांचा अनुभव सुद्धा देण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे दर महिन्यास चित्रपट व नाट्य क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीची भेट व मार्गदर्शन या मुलांना मिळणार आहे. नाव नाव नोंदणी करता सागर नार्वेकर 9970050813, किशोर म्हात्रे 9561838299, मीनल माळी 7448226455, स्वाती पाटील 9881284304, ममता मानकर 9096660848, शर्मिला पाटील 8087787855, प्रणिता म्हात्रे 8237766056, अस्मिता म्हात्रे 8390556660, अहिल्या पाटील 9545102482, हेमलता पाटील 9923615100, स्मिता ढवळे 9011099913, अनिता शेंडे 9421163766, ज्योती घरत 09765900466, नीता घरत 8698622177, नागेशवरी हेमाडे 9850113105, पूजा पडवळ 9527825357, ज्योती दळवी 9145444938 यांना संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. 

अवश्य वाचा

माथेरानच्या पायथ्याशी वणवा