पेण

पी.एन.पी.एज्युकेशन सोसायटीच्या डॉ.आर.टी. धुमाळ इंग्लिश मिडीयम स्कुल जोहे च्या वार्षिक   स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत  आयोजित करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक संतोष पाटील, जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण समिती सदस्य प्रभाकर म्हात्रे.शेखर धुमाळ,कांचन धुमाळ, काशिनाथ पाटील, पुष्कर मोकल,विठोबा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांसमोर बोलताना नगरसेवक संतोष पाटील यांनी  ग्रामीण भागामध्ये विना अनुदानीत इंग्रजी माध्यमाची शाळा चालवणे म्हणजे तारेवरची कसरतच असते,  शहरात आज इंग्लिश माध्यमाची शाळा लाखो रुपये डोनेशन घेऊन सुरु आहेत. मात्र आज जोहे सारख्या ग्रामीण भागामध्ये गेली 10 वर्ष एक रुपयाही पालकांकडून न घेता डॉ.आर टी धुमाळ इंग्लिश माध्यमाची शाळा सुरु आहे याच खरे श्रेय डॉ.शेखर धुमाळ यांना द्यायला हवेत,असे सांगीतले.

 शेखर धुमाळ यांनी आपल्या  मालकीची इमारत गेली 10 वर्ष महिन्याला 1 रुपया भाडे तत्वावर दिली आहे. करोडो रुपयाची इमारत 1 रुपया भाडयाने देण्यासाठी कर्णासारखी दानत्वाची जाण असावी लागते आणी ती जाण डॉ.शेखर धुमाळ यांच्या कडे आहे म्हणूनच गरिबांची मुले  इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये शिकत आहेत.आज  शाळेमध्ये महिन्याला फक्त 300 रुपये फी घेतली जात आहे. या फीच्या जोरावर शाळेच खर्च व शिक्षकांचा पगार केली जात आहेत ही बाब वाखाडण्यासारखी आहे.महत्वाची गोष्ट म्हणजे या शाळेतील शिक्षक हे तुटपुज्या पगारात काम करत आहेत. या शिक्षकांचे कौतुक कराव तेवढ थोडचं,असेही नगरसेवत संतोष पाटील म्हणाले.  मोबाइल सारख्या दुष्ट राक्षसापासून आपल्या पाल्याला दुर ठेवा अन्यथा मोबाइलच्या वेडयाने मुल कोणत्याहि थराला जाऊ शकतील,अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक प्राचार्या अर्चना कटके यांनी  तर संस्थेचे सदस्य  आर.एल् पाटील गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले   गुणवंत विद्यार्थ्यांचा गौवरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. बेस्ट टीचर अवॉडने सौ स्वाती पाटील यांना देऊन गौरविण्यात आला. त्यानंतर विदयार्थ्यानचे गुणगौरव कार्यक्रम घेण्यात आले.

अवश्य वाचा