ठाणे

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.नगरसेवक एका रुग्णालयात कोरोना रुग्णाला भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनाही कोरोना सदृश्य लक्षणं जाणवू लागली होती. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.   टेस्ट केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांना आधीपासूनच मधुमेहाचा त्रास असल्यानं व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, मंगळवारी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.