ठाणे

ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे त्या पार्श्‍वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यात उद्यापासून पुन्हा 10 दिवस म्हणजेच 12 जुलै पर्यंत लॉक डाऊन जारी करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 2 जुलैला सकाळी 7 वाजल्यापासून 12 जुलै सकाळी 7 पर्यंत हे लॉक डाऊन असणार आहे. या लॉक डाऊन मध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे मात्र अन्य कोणीही घराबाहेर पडू शकणार नाही. यामध्ये शहरातील मेडिकल दुकाने, दूध विक्री आणि दवाखाने सुरू राहणार असून उर्वरित सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. याबरोबरच कल्याण डोंबिवलीतही उद्यापासून 12 जुलै पर्यंत लॉक डाऊन केले जाणार आहे. तसेच या 10 दिवसात कोणीही घराबाहेर पडू नये असे  आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लॉक डाऊन चे पालन न करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद