Monday, March 08, 2021 | 09:01 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

अभियंता जोडप्याने बनवले भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर.
सांगली
06-Apr-2020 08:07 PM

सांगली

सांगली 

देशभरात कोरोनाने थैमान घातले असून बळींची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात हायअलर्ट जाहीर करण्यात आले आहे. मात्र तरी देखील महाराष्ट्रामध्ये कोरोनाबधित रुगणाची आणि बळींची संख्या वाढली आहे. जगात कोरोनाबधितांचा आकडा झपाट्याने वाढल्याने आणि जेवढे रुग्ण वाढले तेवढी उपचार यंत्रणा आणि खासकरून व्हेंटिलेटर नसल्यानं मृत्यूचा आकडा वाढतो आहे. हाच धोका भारतात आणि महाराष्ट्र निर्माण होऊ शकतो. नेमका हाच धोका ओळखून वैद्यकीय उपकरणे बनवणर्‍या सांगलीतील सांगलीतील प्रसाद आणि आदिती कुलकर्णी या मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या दाम्पत्याने स्वदेशी कम्प्रेसरचलीत व्हेंटिलेटर बनवला आहे.

सांगलीत एका रुगणाची शस्त्रक्रिया करत असताना या व्हेंटिलेटरचा वापर केला गेला. वैद्यकीय उपकरणे बनवणार्‍या या दाम्पत्याने कोरोनाचा महाराष्ट्रभरात वाढता प्रादुर्भाव आणि व्हेंटिलेटरची असलेली कमी या सर्व पार्श्‍वभूमीवर प्रयोग करत या व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. गंभीर संसर्ग झालेल्या कोविड रूग्णाला व्हेंटिलेटरची जास्त आवश्यकता असते. मात्र बाहेरच्या देशात फक्त जितक्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून आले त्या प्रमाणात व्हेंटिलेटर नसल्याने त्या देशात कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसते. हीच बाब लक्षात घेऊन आणि देशात कोरोनाचे झपाट्याने वाढत असलेले रुग्ण पाहता आपल्याकडे देखील व्हेंटिलेटरची संख्या वाढवणे गरजचे आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top