Monday, March 08, 2021 | 08:56 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सांगलीत फिरता तापाचा दवाखाना सुरु
सांगली
13-Apr-2020 06:01 PM

सांगली

सांगली 

आयएमए मिरज, सांगली महापालिका आणि आयुष यांच्या संयुक्त विद्यमाने मडॉक्टर आपल्या दारीफ या योजनेअंतर्गत  फिरता तापाचा दवाखाना ही संकल्पना सांगलीत राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत डॉक्टर दाट लोकवस्ती असलेल्या भागात जाऊन कॅम्प उभारून  डायबिटीस, हायपर टेंशन असलेल्या लोकांची तपासणी करतायत. याशिवाय खोकला, ताप, सर्दी अशी लक्षणे असणारे लोकांची तपासणी केली जाते आहे. यामुळे जर एखाद्याला जर कोरोनाची लक्षणे आढळली तर त्याचे स्वॅब घेण्याची प्रकिया जलदगतीने होणार आहे. पुढील १० ते १२ दिवस हा कॅम्प सांगली, मिरज भागातील दाट लोकवस्ती असलेल्या भागात घेतला जाणार आहे.

सांगलीतील कोरोना व्हायरसचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना, सांगलीकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. नवी मुंबई येथील रहिवासी असलेली एक व्यक्ती वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथे आपल्या मूळ गावी २० मार्च रोजी आली होती. सदर व्यक्ती रेठरे धरण येथून १० एप्रिल रोजी मुंबईत परतली आहे. मात्र मुंबईत परतल्यानंतर या व्यक्तीची तब्येत बिघडली. उपचारसाठी या व्यक्तीला मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे सदर व्यक्तीची कोविड- १९ टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अपोलो हॉस्पिटल यांच्याकडून खातरजमा करुन पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरु केल्या. खबरदारीचा उपाय म्हणून सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य २५ व्यक्तींना मिरज येथे आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी दिली.

 

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top