Monday, March 08, 2021 | 08:11 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्याने इस्लामपूर लॉकडाऊन
सांगली
13-Apr-2020 06:43 PM

सांगली

सांगली

 सांगलीमधील इस्लामपूर शहरात 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनावर मात केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात येत असताना पुन्हा एकदा करोनाचा रुग्ण आढळल्याने इस्लामपूर नगर परिषदेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तीन दिवसांसाठी हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. 15, 16 आणि 17 एप्रिलला 100 टक्के लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. शहरात फक्त मेडिकल आणि इतर महत्त्वाची सेवा सुरु राहणार आहे.

 सांगलीमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढली आहे. रेठरे धरण येथे हा रुग्ण सापडला आहे. गावी 20 दिवस राहिल्यानंतर तो मुंबईत परतला होता. मुंबईत चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या सांगलीमधील 25 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. मिरजमधील कोरोना रुग्णालयात या सगळ्यांना दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान पूर्वकाळजी म्हणून रेठरे धरण गाव सील करण्यात आलं आहे.

 मुंबईत वास्तव्यास असणारी ही 65 वर्षीय व्यक्ती 20 मार्च रोजी रेठरे धरण येथे आली होती. 5 एप्रिल इतर व्याधींमुळे रोजी आजारी पडल्याने त्यांना इस्लामपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना मुंबईतल अपोलो रुग्णालयात हलवण्यात आलं. 10 एप्रिल रोजी त्यांना मुंबईत आणण्यात आलं. यावेळी मुंबईमधील रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली असता करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं.

 ही व्यक्ती मुंबईला जाण्याआधी इस्लामपूरमधील रुग्णालयात दाखल झाली होती. यामुळे तिथे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. संबंधित व्यक्तीचा इस्लामपूरमध्ये अनेकांशी संपर्क आला होता. याच पार्श्‍वभूमीवर इस्लामपूर शहरात 100 टक्के लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 सांगलीतील मिरज येथे अचानक 25 करोनाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांपैकी 24 रुग्णांची दुसरी चाचणी नेगेटिव आल्यानं मोठं यश मिळालं होतं. पण आता पुन्हा एकदा सांगली जिल्हा प्रशासनासमोर आव्हान उभं राहिलं आहे. दरम्यान संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कुटंबातील पाच आणि इतर 20 अशा 25 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं असून गाव सील करण्यात आलं आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top