Monday, March 08, 2021 | 09:06 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पश्‍चिम महाराष्ट्राला पुन्हा पुराचा विळखा
सांगली
16-Aug-2020 03:23 PM

सांगली

सांगली 

  मागील दोन दिवसांपासून पडत असणार्‍या मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा नदी काठच्या भागाची चिंता पुन्हा वाढवली असून मागील वर्षीप्रमाने यावर्षी देखील पुराची भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. चांदोली धरणातील विसर्ग वाढवून 12 हजार 984 क्युसेक करण्यात आलाय तर दुसरीकडे कोयना धरणातून एकूण 25000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आलाय. तसेच कोयना धरणातुन दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणावर विसर्ग वाढवला जाणार आहे.

 कोयना धरणातून 25604 क्युसेक पाण्याच्या विसर्गात वाढ करून आज सकाळी 11 वाजेपासून कोयना धरणातून एकूण 35000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता एकूण विसर्ग 40000 क्युसेक करण्यात येईल. चांदोली आणि कोयना धरणातील विसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर अलमट्टी धरणातून देखील विसर्ग वाढवण्यात आला असून तो दीड लाख करण्यात आला .

 या विसर्गामुळे सांगलीत कृष्णा नदी सोमवारी सर्वसाधारण पूर पातळी गाठण्याची शक्यता आहे. कोयना धरणातून पंचवीस हजार क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने सोमवारी पाणीपातळी 35 फुटांच्या आसपास जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने सांगलीत नदी काठच्या भागात दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृष्णा नदी काठी असलेल्या श्री क्षेत्र औदुंबर मधील दत्त मंदीरात पाणी शिरले असून जसजशी पाणी पातळी वाढेल तसे मंदीर पाण्याखाली जाण्यास सुरुवात होणार आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top