Monday, March 08, 2021 | 07:57 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

चोरून मद्य विक्री करणार्‍या 21 विक्रेत्यांना सांगलीत अटक
सांगली
05-Apr-2020 05:10 PM

सांगली

सांगली  

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात सर्व मद्य विक्री बंद करण्यात आली असल्याने तळीरामांच्या सोयीसाठी चोरून सुरू असलेली मद्य विक्री थोपविण्यासाठी राज्य उत्पादन विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून सुमारे अडीच लाखाचे मद्य जप्त करून 21 मद्य विक्रेत्यांना अटक केली आहे. तसेच टाळेबंदीच्या काळामध्ये अकारण रस्त्यावर येणार्‍या 25 मोटारींसह सुमारे सव्वा तीन हजार वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून अत्यावश्यक कामाखेरीज नागरिकांना रस्त्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही काही जण काहीही काम नसताना वाहने घेऊन रस्त्यावर येत असून याविरूध्द पोलिसांनी मोहीम उघडली आहे. अशा अकारण गर्दीस कारणीभूत ठरणार्‍या दुचाकीधारकांना लाठीचा प्रसाद देऊनही गर्दी ओसरत नाही हे लक्षात येताच इंधन बंदी करण्यात आली. तरीही हे प्रमाण कमी होत नव्हते. यामुळे पोलिसांनी अशी वाहने जप्तीची मोहीम हाती घेतली. गेल्या दोन दिवसात पोलिसांनी 3 हजार 277  दुचाकी आणि 25 चारचाकी वाहने जप्त करून त्यांच्याविरूध्द दंडात्मक कारवाई केली आहे.

दरम्यान, टाळेबंदीच्या काळामध्ये 14 एप्रिलपर्यंत जिल्हयातील सर्व मद्य विक्रीची दुकाने, परमिटरूम, बिअरबार बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे रोज मद्य सेवन करण्याची सवय असलेल्या तळीरामांची चांगलीच गोची झाली आहे. मिळेल त्या दरात मद्य घेण्याची त्यांची तयारी असल्याचे  लक्षात घेऊन काही व्यक्तींनी अवैध मद्य विक्री सुरू केल्याच्या तक्रारी आल्यानंतर राज्य दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागानेही अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी धाडसत्र हाती घेतले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top