सिंधुदुर्ग 

सिंधुदुर्ग शहराचे ऐतिहासिक समृद्ध व शांत अशी ओळख आहे. माझ्या येथील कालावधीत ही प्रतिमा आणखी उंचावण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. याला बादक असणारी गुन्हेगारी मोडीत काढणार असल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्गचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी ‘कृषीवल’शी बोलताना दिली.

    एसपी दाभाडे पुढे म्हणाले की, मुंबई विभागामध्ये पोलीस गुन्हे शाखेत उपायुक्त म्हणून काम करीत असताना गुन्हेगारी मोडीत काढली. जगात कुठेही गुन्हेगारी नाही असे कुठेही नाही मात्र,  सिंधुदुर्गात गुन्हेगारी कमी कशी राहील व त्या व जास्तीत जास्त प्रतिबंध कसा राहील यावर आपला एकच  फोकस राहणार आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी सेंटर वर लक्ष केंद्रित करून बेसिक पोलिसिंग वर भर दिला जाईल. शांतता प्रस्थापित करण्यासाठी गुंडांना कायद्याच्या कचाट्यात आणले जाईल. तडीपार असणार्‍या तडीपाराची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले जातील.

 जिल्ह्यात असलेल्या अवैध धंद्यांना त्या त्या ठिकाणच्या प्रभार्‍यांनी आळा न घातल्यास क्रॉस  रेड मध्ये अवैध धंदे सापडल्यास त्यांचे परिणाम प्रभारी अधिकार्‍यांना भोगावे लागतील असा सज्जड दम त्यांनी जिल्ह्यातील कारभार्‍यांना दिला आहे.

महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य

मुबंई या ठिकाणी गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून  इतर काही जिल्ह्यात काम केले आहे. या जिल्ह्यात काम करीत असताना महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावीपणे उपाययोजना राबवल्या जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलावरील अत्याचार रोखण्याचे प्रथम देणार आहे. रस्त्यावरील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी नागरिक व पोलीस यांचा मेळ घालून उपाययोजना करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

बेकायदा सावकारी संपवणार

जिल्ह्यात बेकायदा सावकारी व बेकायदा गुटखाविक्री मुळापासून उखडून टाकणार आहे. येत्या महिन्याभरात पोलीस अधिकारी, पत्रकार, नागरिक विविध माध्यमातून याबाबत माहिती घेतली जाणार आहे. या गोष्टी करणारे व त्यांच्या पाठीशी असणार्‍यांना कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दाभाडे यांनी दिला.

अवश्य वाचा