रत्नागिरी 

 कोकणमध्ये जोरदार वार्‍यासह पाऊस कोसळत आहे. काल दुपारपासून पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे. रात्रभर पाऊस कोसळत आहे. चिपळूण, राजापूर आणि खेड येथील नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याचे दिसून येत आहे. खेडमधील गजबुडी नदीचे पाणी भरणा नाका पुलापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे हा पूल पाण्याखाली जाण्याची भिती वर्तविण्याच येत आहे. दरम्यान, रत्नागिरी जवळील चांदेराई येथील बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. संगमेश्‍वर येथील शास्त्री नदीला पूर आला आहे.

 जगबुडी नदीला पूर

खेड जगबुडी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली असून  भरणे नाका पूला पर्यंत पाण्याची पातळी आली आहे. आज सकाळी सहा वाजता अलर्ट जारी करण्यात आला  होता. सात वाजता नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड शहरात पाणी भरण्याची शक्यता असल्याने अनेकांनी दुकाने बंद ठेवणे पसंत केले आहे. सकाळी पावसाचा जोर कायम दिसून येत आहे.

    रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 92.71 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यामध्ये दापोली, लांजा, राजापूर वगळता  इतर सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे.  संगमेश्‍वर मध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून येते 142.30 मिलिमीटर  पाऊस पडला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात  मंडणगडमध्ये 102.30 मिमी, दापोली 70.80, खेड 98.60 मिमी, गुहागर 110.60, चिपळूण 83.60 मिमी, संगमेश्‍वर 142.30 मिमी, रत्नागिरी 33.30 मिमी, राजापूर 60.30 मिमी, लांजा65.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही