अलिबाग :

अवकाळी पाऊस, कोरोना वादळ यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकर्‍यांनी भाजीपाला, अन्नधान्याचा , पुरवठा केला आहे. आपण त्यांचे ऋण व्यक्त करू करून  या प्रतिकूल परिस्थितीत सरकार शेतकर्‍यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांना सांगितले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अंड अँग्रिकल्चर च्या कृषी समिती तर्फे शेतकर्‍यांना जाणवणारे विविध प्रश्‍न, निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील आंबा , काजू , नारळ , सुपारी उत्पादकांची कधीही ही भरून न येणारी हनी झाली . सदोष बियाणे , कोरोनामुळे ठप्प झालेली कृषी मालविक्री आधी अडचणीं बाबत नुकतेच ऑनलाइन चर्चासत्र झाले.

चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडळेचा यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून चेंबरच्या कार्याची व विविध योजनांची यावेळी माहिती दिली. चेंबरचे उपाध्यक्ष अनिल कुमार कोठा यांनी ना. भुसे यांचा परिचय करून दिला.  चेंबरच्या कृषी कमिटीचे को. चेअरमन चंद्रकांत मोकल यांनी कोरोनाच्या पार्दूभावामुळे लॉकडाऊन व संचार बंदी मुळे ठोक विक्रीसाठी असलेल्या एपीएमसी बंद शहरांतील छोट्या मंडई, आठवडी बाजार , राज्यांतील बाजारपेठ व राज्याबाहेरील बाजारपेठ बंद झाल्यामुळे विक्री व्यवस्था ठप्प झाली. त्यामुळे कोकणातील शेतकर्‍यांचा तयार आंबा झाडावरच खराब झाला. शासनाने मंजूर केलेल्या वाहतूक परवान्यांचा लाभ घेऊन काही प्रमाणात विक्री झाली . मात्र दि . 3 जून 2020 च्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील आंबा , काजू , नारळ , सुपारीच्या बागा उध्वस्त झाल्या . शासनाने याची दखल घेऊन आंबा नुकसानीसाठी हेक्टरी रु. 50 हजार मदत जाहीर केली . मात्र त्याचा अध्यादेश अजून निघाला नाही. अर्थात उद्वस्त बागांसाठी ही मदत अपुरी आहे.

नारळ , सुपारीच्या बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी कमीत कमी 12 वर्षे लागतात या बाबीचा गांभीर्याने विचार करून ठोस उपाय योजना करावी आदी मागण्या यावेळी केल्या. यावर्षी सदोष बियाण्यांचे चे प्रमाण वाढल्यामुळे शेतकर्‍यांची ची अवस्था बिकट झाली आहे. तरी शेतकर्‍याच्या जीवाशी खेळणार्‍या बियाणे उत्पादक कंपन्यांवर कठोर कारवाई करावी व या शेतकर्‍यांना आधार द्यावा अशी मागणी यावेळी चेंबरचे जी.सी. मेंबर जी. के. बेलणेकर यांनी केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आपणाकडे मांडलेल्या प्रश्‍नांची आपण गांभीर्याने दखल घेऊ असे आश्‍वासन कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेवटी दिले.