वाकण 

कोरोनाच्या महामारीच्या व आपत्तीच्या काळातही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी धैर्याने सामोरे जाऊन अहोरात्र कार्य करणार्‍या नागोठणे विभागातील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व आंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस या सर्व कोरोना योद्धांचा विशेष मानपत्र देऊन आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. युवक राष्ट्रवादीचे नागोठणे विभागीय अध्यक्ष निवास पवार यांच्यावतीने सुमारे 22 कोरोना योद्धांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी नागोठण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांचाही कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.

ऐनघर ग्रामपंचायतीच्या सभागृहात शुक्रवारी (दि.10) दुपारी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला आ. अनिकेत तटकरे यांच्यासह ऐनघर विभागातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोहन पवार, तानाजी लाड, यशवंत हळदे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, नागोठणे विभाग अध्यक्ष निवास पवार, ऐनघरचे सरपंच चंद्रकांत शिद, ग्रा.पं.सदस्य मनोहर सुटे, पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे, जितेंद्र धामणसे, मंगेश जाधव, अशोक कापसे, युवक राष्ट्रवादीचे रोहा तालुका उपाध्यक्ष दिपेंद्र आवाद, वणी ग्रामपांचायतीच्या सरपंच प्रगती आवाद, कृष्णा लाड, निलेश बलकावडे, सुमित काते, ग्रामविकास अधिकारी  आदींसह आंगणवाडी व आशा सेविका, मदतनीस तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....