माणगाव 

केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून शुक्रवार दि. तीन रोजी निषेध दिन पाळण्यात येणार आहे.

सरकारी कर्मचारी मागील 3 महिन्यात सुट्टी न घेता कोरोनाच्या  प्रचंड दडपणा खाली काम करीत आहेत. काही कर्मचारी 12 -12 तास काम करीत आहेत.

       आज देशातील फक्त सरकारी कर्मचारी जीवावर उदार होऊन जनतेची सेवा करीत आहेत, असे असताना केंद्र सरकार खाजगीकरण व विविध कामगार विरोधी धोरणांचा अवलंब करून कर्मचार्‍यांची नोकरी धोक्यात आणत आहे. अखिल भारतीय सरकारी कर्मचारी महासंघाच्या निर्देशान्वये  3 जुलै रोजी राष्ट्रीय निषेध दिन पाळण्या संदर्भात मीटिंग मध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. त्या नुसार केंद्र सरकारच्या या कर्मचारी विरोधी धोरणाविरोधात तसेच राज्य सरकारने कर्मचार्‍यांचे गोठविलेले भत्ते व अन्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि. 3 जुलै रोजी दुपारी भोजन सुट्टीत सर्व कार्यालयासमोर निदर्शने करून कार्यालय प्रमुखांना निवेदन द्यायचे आहे, असे संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदीप नागे व सरचिटणीस प्रभाकर नाईक यांनी सांगितले.