Thursday, December 03, 2020 | 12:01 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

आदिवासी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण
रायगड
25-Oct-2020 05:29 PM

रायगड

 पोलादपूर 

स्वदेस फाऊंडेशन व आयएल अ‍ॅण्ड एफएसमार्फत पोलादपूर तालुक्यातील उमरठ ग्रामपंचायतीअंतर्गत चांदके गावातील 14 आदिवासी तरूणांना मेस्त्री काम कौशल्यप्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

तालुक्यातील चांदके येथील श्रीदेवी गाव विकास समिती यांच्या मागणीनुसार चांदके गावामधील समाज मंदिरामध्ये मेस्त्री काम कौशल्य प्रशिक्षण उदघाटन समारंभ विद्येची देवता मातासरस्वती पूजन करुन उमरठ ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत कळंबे यांच्याहस्ते पार पडला. यावेळी उपस्थित पाहुण्यांचे समितीतर्फे स्वागत करण्यात आले. प्रशिक्षण कालावधीमध्ये लागणार्‍या मेस्त्री कामाच्या किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वदेस फाऊंडेशनचे समन्वयक सुजल अहिरे,आयएलऍण्डएफएसच्या अर्चना जाधव, प्रशिक्षक शरद मोहिते समितीचे अध्यक्ष अनंत बोराणे, उपाध्यक्ष प्रकाश सकपाळ, सचिव संगिता बोराणे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर मेस्त्री काम कौशल्य प्रशिक्षण 45 दिवस सुरू असून या काळात प्रशिक्षण 14 आदिवासी युवक प्रशिक्षण घेणार असून गावातील तरुण आदिवासी बांधव शास्त्रशुध्द मेस्त्री काम शिकणार असल्याबद्दल समितीकडून स्वदेस फाऊंडेशनबाबत समाधान व्यक्त होत आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थी तरूणांनी सोशल डिस्टंन्सिंग ठेऊन मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी चांदके येथील श्रीदेवी गाव विकास समिती जागरूकपणे प्रयत्न करीत आहे. या प्रशिक्षणासाठी स्वदेस फाऊंडेशन पोलादपूरचे व्यवस्थापक गणपती नांगरे व प्राजक्ता खेडेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top