माणगाव  

माणगाव नगरपंचायत हद्दीत दि.29 जून ते 3 जुलैपर्यंत जनता कर्फ्युचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या जनता कर्फ्युला माणगावात चौथ्या दिवशीही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

माणगावात गेल्या पंधरा दिवसांपासून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात कोरोनाचे रुग्ण सरकारी कार्यालयातून तसेच घरातून आढळू लागल्याने शहरवासियांनी याची चांगलीच धास्ती घेतली आहे. या विषाणूपासून शहर मुक्त व्हावे यासाठी  खबरदारी म्हणून माणगावकर नागरिकांनी एकत्र येत जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला. रुग्णालय व औषधांची दुकाने दिवसभर तसेच सकाळी 6 ते 9 यावेळेत परवानाधारक दूध डेअरी उघडी ठेवण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. गेले चार दिवस माणगावकर नागरिकांनी, व्यापार्‍यांनी जसे प्रशासनाला सहकार्य केले असेच सहकार्य यापुढेही कायम ठेवा, असे आवाहन नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांनी करून सर्वांंना काळजी घेण्याचे अवाहन केले  आहे.

 

अवश्य वाचा