अलिबाग 

 महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेमार्फत मांडलेल्या विविध मागण्या 3 वर्षांपासून प्रलंबित असल्याने रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात 1 ऑक्टोबर पासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन खोत, कार्याध्यक्ष अशोकराव चव्हाण, सचिव सागर पवार यांनी दिली.

 सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या तात्काळ कराव्यात, कोरोना महामारीमुळे मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी शासनाचे 30 टक्के उपस्थितीचे आदेश असताना 100 टक्के उपस्थितीमध्ये काम करत आहेत. मात्र विभागातील कर्मचार्‍यांसाठी मागणी करुन सुद्धा जीवन सुरक्षा विमा कवच लागू केलेले नाही. कोविडमुळे आतापर्यंत 6 अधिकारी व कर्मचार्‍यांचा मृत्यू झालेला आहे. तुकडेबंदी कायद्याने होणार्‍या कारवाया, रेरा कायद्यामध्ये होणारी कार्यवाही, सह दुय्यम निबंधक वर्ग-2 व दुय्यम निबंधक श्रेणी-1 संवर्गाचे एकत्रीकरण व्हावे, हार्डवेअर आदि साहीत्य मिळावे, आयकर विवरणपत्र, पोलीस आणि इतर विभागाकडून मागणी केल्या जाणार्‍या माहिती बाबत, ई सरिता, ,ए-र्चीींरींळेप, ॠीरी व आधार सर्व्हरबाबत विविध मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. यासह शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कोणत्याही सोयी सुविधा पुरविण्याबाबत बेमुदत लेखणीबंद आंदोलन करण्यात येत आहे.

विविध मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लेखणीबंद आंदोलन  करीत आहोत. यामुळे दस्त नोंदणीसह कार्यालयात कोणतेही कामकाज होणार नाही. नागरिकांनी याबाबत संघटनेला सहकार्य करावे.

 - संजय घोडजकर

दुय्यम निबंधकश्रेणी-1पेण जि रायगड

अवश्य वाचा