अलिबाग  

रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना चे रुग्ण आढळत असले तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील दिलासादायक असे आहे. 24 तासांत नव्याने नोंद झालेल्या 212 रुग्ण आणि कोरोनामुक्त झालेल्या 355 तर उपचार सुरू असताना मृत्यु झालेल्या 6 रुग्णांमुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 16 हजार 541 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 12 हजार 929 रुग्ण कोरोना मुक्त झाले तर 447 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. सध्यस्थीतीत 3 हजार 165 रुणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील कोणतीच लक्षणे नसलेल्या अनेक जणांवर घरीच उपचार सुरू आहेत.

नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा क्षेत्रात 99, पनवेल ग्रामीण 23, उरण 11, खालापूर 21, कर्जत 8, पेण 8, अलिबाग 18, माणगाव 7, तळा 2, रोहा 8, सुधागड 1,श्रीवर्धन 2, महाड 4 अशा 212 रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना मृत पनवेल मनपा 2, तर पनवेल ग्रामीण, खालापूर, रोहा, महाड या चार तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी बरे झालेल्या तसेच लक्षणे नसूनही पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींचा विलगिकरण कालावधी पूर्ण झाल्याने कोरोनामुक्त ठरलेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा क्षेत्रातील 135, ग्रामीण 38, उरण 13, खालापूर 32, कर्जत 14, पेण 23, अलिबाग 11, मुरुड 8,  माणगाव 5, रोहा 20, सुधागड 3, श्रीवर्धन 7, म्हसळा 41, महाड 4 व पोलादपूर 1 अशा 355 जणांना घरी सोडण्यात आले.

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही