पेण 

पेण शहरातील सर्वात रहदारीचा रस्ता समजला जाणार्‍या महानगर गॅस पाईप लाईन कंपनीच्या कृपेने राजु पोटे मार्गावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. महत्वाची बाब म्हणजे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ  असल्याने  नागरीकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

 जुन महिन्याच्या सुरूवातीलाच महानगर गॅस पाईप लाईन कंपनीने राजु पोटे मार्ग खोदले आणि योग्य प्रकारे खोदाई केलेला भाग भराव करून न भरल्याने या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सदर खोदाई बद्दल नगरपालिकेचे अभियंता अमित शेळके यांना नगरसेवक संतोष पाटील यांनी संपर्क करून गॅस कंपनीने केलेल्या खोदाईबाबत सांगितले होते. त्यानंतर अभियंता अमित शेळके यांनी तेथील पाहणी देखील केली होती. मात्र रस्त्याची डागडुजी काही झाली नाही अथवा महानगर गॅस पाईप लाईन कंपनीवर कोणतीच कारवाई झाली नाही. सर्व कामात परफेक्ट समजणार्‍या मुख्याधिकार्‍यांना राजु पोटे मार्गावरील खोदाई केल्याचे समजले नाही का? अथवा या रस्त्यांवरील खड्डयांचे साम्राज्य असल्याचे माहित नाही का? असा सवाल सर्वसामान्य जनता करत आहे. तसेच राजु पोटे मार्गावरील खड्डे केव्हा भरतील याची प्रतिक्षा पेणकर नागरिक करत आहेत. 

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही