पाली/बेणसे  

रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतोय.अशातच अनेक तालुक्यांना देखील कोरोना चा विळखा घट्ट बसतोय. सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पाली शहरात शनिवारी (दि.27) एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आणि बुधवारी (दि.1) या रुग्णाची आई आणि पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालीत कोरोना बधितांची संख्या तीनवर गेली आहे.

    पहिला रुग्ण सापडल्यानंतर खबरदारी म्हणून रविवार (दि.28) ते बुधवार (दि.1) पाली बाजारपेठ व्यापारी असोसिएशन व ग्रामपंचायतीच्या वतीने उत्स्फूर्त बंद ठेवण्यात आली आहे. मात्र हे लॉकडाऊन रविवार (दि.5) तारखेपर्यंत वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सायंकाळी पाली तहसील कार्यालयात बैठक होणार आहे.

   प्रशासन कोरोनाच्या संदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी तालुक्यातील जनतेला केले.

    तर सुधागड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी सांगितले की हे तिन्ही रुग्ण वावळोली येथील कोविड सेंटर मध्ये योग्य प्रकारे उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या निजकच्या संपर्कात आलेल्यांना देखील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या येथे एकूण 12 जण आहेत. नागरिकांनी सावधान राहावे, घाबरून जाऊ नये पण नियम पाळून काळजी घेणे गरजेचे आहे. असे डॉ. मढवी म्हणाले.

     सुधागड तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण नुकतेच बरे होऊन घरी परतले होते. मात्र तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण असलेले पाली कोरोनापासून दूर होते. शनिवारी (दि.27) एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

    सुधागड तालुक्यात मे महिन्यात कोरोनाने शिरकाव केला (दि.24) नागशेत येथील एका 62 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉजीटिव्ह आला होता. त्यानंतर 2 जून ला गोमाशी येथील एका 24 वर्षीय तरुण व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र काही दिवसांपूर्वी हे दोन्ही रुग् बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र आता पालीत 3 कोरोना रुग् सापडल्याने तालुक्यासह पालीत नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

 

अवश्य वाचा