Tuesday, April 13, 2021 | 01:07 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पाचाड सरपंचाविरोधांत अविश्‍वास ठराव
रायगड
04-Mar-2021 07:44 PM

रायगड

महाड | प्रतिनिधी

पाचाडच्या सरपंच  सयोगिता गायकवाड यांच्या विरोधात अविश्‍वासाचा ठराव दाखल करण्यांत आला. पंचायतीच्या सर्वच्या सर्व सात सदस्यांनी एकत्र येऊन हा ठराव दाखल केला आहे.  सातही सदस्यानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदे मध्ये ही माहिती दिली.या अविश्‍वास ठरावावर चर्चा करण्यासाठी येत्या आठ दिवसामध्ये ग्रामपंचायतीची विषेश सभा आमंत्रित करण्यांत येणार आहे.

पाचाड ग्रामपंचायतीच्या सरपंच कुमारी संयोगिता गायकवाड यांच्यावर पंचायतीच्या सातही सदस्यांनी अविश्‍वासाचा ठराव दाखल केल्या नंतर त्यानी तहसिलदार महाड यांची भेट घेतली त्या नंतर सदस्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला माजी संरपंच रघुवीर देशमुख,माजी सरपंच राजेंद्र खातु,सदस्य अश्‍विनी बैकर,दर्शना गायकवाड,माधवी देशमुख,किरण गायकवाड,यांच्या सह देविदास गायकवाड,पाचाड ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सरंपच यांच्या विरोधांमध्ये विविध आरोप करण्ंयात आले,

पाचाड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करण्ंयात येत आहे. रायगड विकास प्रधिकरणातर्फे देखील  या भागांमध्ये विकासाची कामे सुरु आहेत. या कामांविषयी सदस्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही.त्याच बरोबर नागरिकांच्या समस्या सोडविण्यां कडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप देखील उपस्थित सदस्यांनी केला.

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top