नेरळ 

 केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या मान्यतेने व दिशा केन्द्र या सामाजिक संसस्थेच्या समन्वयाने रायगड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या रायगड चाईल्ड लाईन 1098 या प्रकल्पाच्या वतीने कर्जत तालुक्यातील आदिवासी कुटुंबाना मदतीचा हाथ दिला बिड (बू)वाडी व खाणीच्या वाडीतील आदिवासी कुटुबाना धान्याचे वाटप करत सामाजिक बाधिलकी जपली आहे.

चाइल्ड लाइन ही संस्था अडचणीत असलेल्या मुलांना मदत करणेसाठी कार्यरत असून कोणीही पालक अथवा शेजारी मुलांच्या वतीने 1098 या चोविस तास चालवण्यात येणार्‍या टोल फ्री,मोफत हेल्पलाईन वर फोन करू शकतो.फोन आल्यानंतर तात्काळ आर्ध्यातासात त्या मुलांना मदत दिली जाते.या चाईल्ड लाईन प्रकल्पाच्या वतीने ही मदत दिली जात असून पूढील सहा महिने ज्या कुटुंबांना गरज गरज आहे,अशा कुटुंबांना धान्याची मदत दिली जाईल अशी माहिती वैश्‍नवी दभडे यानी दिली.चाईल्ड लाईन प्रकल्प चे संचालक अशोक जंगले, समन्वक वैश्‍वनवी दभडे,सदस्य कवीता सुर्यवंशी,रेखा भालेराव,कँन प्रकल्पाच्या विमल देशमुख आदी कार्यकर्त्याच्या टिमने आदिवासी वाडीवर जाउन घरपोच धान्याचे किट वाटप केले.यावेळी त्या कुटुंबांना तांदूळ,डाळ,तेल,गरम मसाला, साखर,चहा पावडर आदी धान्याच्या किटचे वाटप बीडच्या कातकर वाड्यात करण्यात आले.

 

अवश्य वाचा